Beti Bachao Beti Padhao
Bank of Maharashtra

आमच्या विषयी

भारतीय उपखंड व त्यामधील मुबलक नैसर्गिक संसाधने यामधील महाराष्ट्राच्या स्थानामुळे, त्याला व्यावसायिक घडामोडींचा प्रदीर्घ इतिहास लाभला आहे.
महाराष्ट्र हा एक प्रगतीशील प्रदेश आहे आणि बँकिंग उपक्रम महाराष्ट्रात बऱ्याच आधीपासून सुरु करण्यात आले आहेत. ऐतिहासिकदृष्ट्या १८४० साली स्थापित झालेली ‘बँक ऑफ बॉम्बे’ ही महाराष्ट्रातील पहिली व्यवसायिक बँक होती.
तथापि, मुंबईबाहेर १८८९ साली ‘बँक ऑफ पुना’ ही महाराष्ट्रातील पहिली व्यावसायिक बँक स्थापन झाली, त्यानंतर १८९० साली ‘डेक्कन बँक’ आणि १८९८ साली ‘बॉम्बे बँकिंग कंपनीची’ स्थापना झाली. पहिले महायुद्ध सुरू झाल्यानंतर जगाला महामंदीला सामोरे जावे लागले. परिणामी, भारतातील बॅंकांचे मोठे नुकसान झाले. १९१४ आणि १९३५ च्या दरम्यान देशात ३८० बँका डबघाईला आल्या, त्यापैकी ५४ बँका या बॉम्बे प्रांतामधील होत्या.
या महामंदीचा परिणाम मुख्यत्वेकरून महाराष्ट्रावर झाला, कारण महाराष्ट्रात बऱ्याच काळापासून चालू असणाऱ्या बँकासुद्धा बंद झाल्या होत्या. महामंदीचे परिणाम हळूहळू कमी होऊ लागले आणि एका नवीन आशेच्या किरणासोबत अर्थव्यवस्थेमध्ये नवीन उद्योग, बँकिंग क्षेत्रासह उदयास येऊ लागले.

 

स्वतंत्र बँक ऑफ महाराष्ट्रची गरज भासू लागली

१९३४ साली पुणे येथे 'महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स' (एमसीसी) ची स्थापना करण्यात आली आणि या संस्थेचे संस्थापक एक उत्तम दूरदृष्टी असलेले सचिव श्री. ए. आर. भट होते.
श्री. भट यांनी एमसीसी संस्था स्थापनेच्या काही महिन्यांतच लोकमान्य टिळकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रकाशित होणाऱ्या केसरी वृत्तपत्राच्या विशेषांकामधून या प्रांतात उपलब्ध असलेल्या बँकिंग सेवांचा व्यापक आढावा घेण्यास सुरुवात केली.
सहकार चळवळीचे आद्य प्रणेते म्हणून ओळखले जाणारे त्यांचे मित्र श्री. व्ही. पी. वर्दे यांनी महाराष्ट्रासाठी स्वतंत्र बँक स्थापनेची गरज का आहे, या विषयी केसरी वृत्तपत्राच्या विशेषांकामध्ये लेख लिहिला व या विषयावर सार्वजनिक चर्चासत्र सुरू केले. श्री. वर्दे यांच्या लेखाला हवा तसा लक्षणीय प्रतिसाद मिळत नसतानादेखील श्री. भट यांनी व्यापार व उद्योगक्षेत्रातील नेत्यांसोबत या विषयावर चर्चासत्र चालू ठेवले.
फेब्रुवारी १९३५ मध्ये एमसीसीच्या वतीने 'पुण्यातील व्यवसाय आणि उद्योग' ही परिषद आयोजित करण्यात आली. या परिषदेत महाराष्ट्रातील बँकिंगच्या विस्तारासाठी योग्य ती काळजी घेण्यात आली.
श्री. भट यांनी मराठा चेंबर आणि त्याचे संचालक महाराष्ट्रासाठी स्वतंत्र बँक हा मुद्दा उचलून धरतील याची योग्य सुनिश्चितता करून घेतली.
"महाराष्ट्रातील व्यापार आणि उद्योगाला भांडवल पुरविण्यासाठी, संयुक्त व्यावसायायिक बँक स्थापन करणे आवश्यक आहे. म्हणूनच मराठा चेंबरने या बँकेच्या वतीने आवश्यक ती सर्व चौकशी करून अशा स्वरुपाच्या अस्थायी बँकेवर योग्य ती कारवाई करण्याची विनंती केली आहे. महाराष्ट्रामधील व्यावसायिक संघटना अशा प्रयत्नांना सहकार्य करण्यास उत्सुक आहेत.”
20 व्या शतकाच्या पहिल्या दशकातील स्वदेशी चळवळीने महाराष्ट्रात भारतीय व्यवस्थापनेच्या अंतर्गत अनेक व्यापारी बँकांची स्थापना करण्यासाठी प्रोत्साहन दिले.
योजनेचा तपशीलवर अभ्यास करण्यासाठी एमसीसीने उप-समितीची स्थापना केली ज्यामध्ये श्री व्ही. जी. काळे, डी. के. साठे, एन. जी. पवार, जी. डी. आपटे आणि ए. आर. भट यांचा समावेश होता.
समितीची पहिली बैठक १९ मे १९३५ रोजी केसरी मराठा कार्यालयाच्या विचारविनिमय कक्षामध्ये झाली आणि समितीच्या सदस्यांसह शहराचे प्रमुख व्यक्तिमत्त्व श्री. बाबासाहेब कामत, एमसीसीचे तत्कालीन अध्यक्ष जे. एस. करंदीकर, राजाभाऊ गोडबोले, गोविंदराव पंडित, दामूअण्णा पोतदार, एस. आर. सरदेसाई, बाबुराव गोखले आणि एन. एन. क्षीरसागर यांनीही चर्चासत्रामध्ये भाग घेतला.
२७ मे १९३५ रोजी केसरी मराठा कार्यालयाच्या सभेच्या हॉलमध्ये मोठ्या प्रमाणावर हजर असलेल्या सार्वजनिक प्रतिनिधींसह उपसमितीची दुसरी सभा झाली, ज्याध्ये प्रस्तावित बँकेच्या मंडळावरील संचालकांची संख्या (जास्ती जास्त ११ सदस्य), प्रत्येक शेअरची किंमत (रु. ५०/- असावी) आणि संचालक होण्यासाठी प्राथमिक अट (किमान ५०० समभाग घेणे आवश्यक) अशा विषयांवर चर्चा झाली.

 

16 सप्टेंबर 1935 च्या शुभदिवशी बँकेची औपचारिकपणे भारतीय कंपनी कायद्याअंतर्गत नोंदणी करण्यात आली.

19 promoters (Sarvashri)

बँकेच्या संस्थापन समयलेख आणि संस्थापन नियमावली यावर 1 9 प्रवर्तकांनी स्वाक्षरी केली.

संचालक मंडळइतर
1. प्रा. व्ही. जी. काळे1. ए. आर. भट
2. डी. के. साठे2. एस. एम. जोशी
3. बी. एम. गुप्ते3. बी. एस. कामत
4. एन. जी. पवार4.  एस. आर. राजगुरू
5. व्ही. टी. रानडे 5. आर. एन. अभ्यंकर
6. व्ही. पी. वर्दे6.  टी. व्ही. साने
7. एम. आर. जोशी7. डी. जी. बापट
8. एस. जी. मराठे8.जी. एस. मराठे
9. रघुनाथराव सोहोनी9.  डी. डी. चितळे
10. डी. व्ही. पोतदार

साक्षीदार स्वाक्षरीकर्ता: श्री जी. डी. आपटे

First Board of Directors

दि बँक ऑफ महाराष्ट्र लि. च्या संचालक मंडळातील पहिले सदस्य खालील सदस्यांसह एकत्रित

प्रो. व्ही. जी. काळे, भारतीय दरपत्रिका मंडळाचे माजी सदस्य, जुन्या पिढीतील नामवंत अर्थशास्त्रज्ञ आणि शिक्षणतज्ञ
श्री. डी. के. साठे, एक उद्योजक आणि एक प्रमुख सामाजिक कार्यकर्ते ज्यांना सहकारी बँकिंगचा अनुभव होता.
श्री. बी. एम. गुप्ते, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष
श्री. एन. जी. पवार, अभियंता आणि कंत्राटदार
श्री. व्ही. टी. रानडे, मे. व्ही. आर. रानडे आणि सन्स इंजिनीअर्स आणि कंत्राटदारांची एक अग्रणी संस्था
श्री. व्ही. पी. वर्दे, सहकारी चळवळीतील एक प्रमुख व्यक्तिमत्त्व ज्यांनी या दिशेने मोठी जोमाने प्रेरणा दिली
श्री. एम. आर. जोशी, पुण्यातील अग्रगण्य कागद व्यापारी
मेसर्स व्ही. आर. रानडे अँड सन्सचे श्री. एस. जी. ऊर्फ अण्णासाहेब मराठे
श्री. रघुनाथराव सोहनी, एक अग्रगण्य व्यापारी ज्यांनी सुरुवातीला बँक ऑफ महाराष्ट्राराच्या स्थापनेचे ठराव मंजूर केले.