Beti Bachao Beti Padhao

प्रत्यक्ष कर रकमेचा ई-भरणा - आयकर, टीडीएस इ.

निधी हस्तांतरण सुविधेसह आमच्या सर्व रिटेल आणि कॉर्पोरेट इंटरनेट बँकींग ग्राहकांसाठी उपलब्ध असलेली सेवा!

बँक ऑफ महाराष्ट्र तुमची सीबीडीटी देयक ऑनलाइन भरण्याची सुविधा देतेइंटरनेट बँकिंग चे ग्राहक असल्यास तुम्हाला या सुविधेचा लाभ घेता येतो.या सुविधेचा उपयोग करण्यासाठी तुमचा सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (सीबीडीटी) मध्ये करपात्र म्हणून वैध पॅन व टॅन क्रमांक असणे आवश्यक आहे.तुमच्याकडे बँक ऑफ महाराष्ट्रचा इंटरनेट बँकिंग वापरकर्ता-आयडी आणि पासवर्ड असणे आवश्यक आहे. या सुविधेचा वापर करून, आपण दिवसभरात केव्हाही देय रक्कम भरू शकता. ही सुविधा सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्समध्ये नोंदणी केलेल्या सर्व करदात्यांसाठी उपलब्ध आहे.

प्रत्यक्षकराचा ई-भरणा करण्यासाठी अनुसरण करावयाच्या पायऱ्या ...

  1. बँक ऑफ महाराष्ट्रच्या इंटरनेट बँकिंग साइटला भेट द्या आणि करदात्याच्या ई-भरणा पर्याय निवडा आणि आपला कर भरणा प्रकार निवडा.
  2. प्रत्यक्ष कर ऑनलाइन भरणा करण्यासाठी या पृष्ठाच्या तळाशी असलेल्या "नवीन भरणा सुरू करा" लिंकवर क्लिक करा. हे तुम्हाला एनएसडीएल च्या वेबसाइटवर पुनर्निर्देशित करेल
    https://onlineservices.tin.egov-nsdl.com/etaxnew/tdsnontds.jsp
  3. संबंधित चलन निवडा.
  4. संपूर्ण तपशील (अनिवार्य माहिती भरणे सुनिश्चित करा / रकाने) प्रविष्ट करा.
  5. पॅन प्रणाली द्वारे सत्यापित केले जाईल.
  6. सूचीतून बँक ऑफ महाराष्ट्र निवडा आणि सबमिट वर क्लिक करून पुढे चला.
  7. तुम्हाला बँक ऑफ महाराष्ट्रच्या कर भरणा प्रवेशमार्गाकडे (बीओएमची इंटरनेट बँकिंग साइट) निर्देशित केले जाईल.
  8. कॉर्पोरेट / रिटेल पर्याय निवडा
  9. लॉग इन पृष्ठावर वापरकर्ता आयडी आणि लॉगइन पासवर्ड प्रविष्ट करा.
  10. लॉग-इन पासवर्डची पडताळणी झाल्यानंतर, तुम्हाला देयक पृष्ठावर नेले जाईल ज्यामध्ये चलन तपशील दाखवले जातील.
  11. रक्कम प्रविष्ट करा डेबिट आणि ट्रान्झॅक्शन पासवर्ड बनवण्यासाठी खाते निवडा आणि सबमिट करा वर क्लिक करा.
  12. तुम्ही भरलेल्या आणि निवडलेल्या सर्व चलन तपशीलांसह भरणा पुष्टीकरण पृष्ठ सादर केले जाईल. तुम्ही भरणा करू इच्छित असल्यास "पुष्टी करा” वर क्लिक करा किंवा तुम्ही व्यवहार रद्द करू शकता.
  13. भरणा पूर्ण झाल्यानंतर सायबर पावती प्रदर्शित केली जाईल, जी तुम्ही प्रिंट करू शकता.
  14. तुम्ही "डुप्लिकेट चलन" मेनू अंतर्गत इंटरनेट बॅंकिंग सामान्य लॉगइनच्या अंतर्गतडुप्लिकेट चलनाची प्रिंट घेऊ शकता.

तुम्ही अद्याप आमची महा संपर्क कनेक्ट बँकिंग सुविधा घेतलेली नसल्यास, कृपया

  1. निधी हस्तांतरण सुविधेचा वापर करून महाकनेक्ट इंटरनेट बँकिंग सेवेसाठी अर्ज करा.
  2. विनंती अर्ज डाऊनलोड करण्यासाठी आणि तुमच्या शाखेत सादर करण्यासाठी संबंधित हायपरलिंकवर क्लिक करा.
  3. तुम्ही पोस्ट / कूरियरद्वारे तुमचा कॉर्पोरेट आयडी आणि / किंवा वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड प्राप्त कराल.
  4. कृपया बीओएम च्या इंटरनेट बँकिंग साइटवर लॉग इन करा,
  5. “कर रकमेचा ई-भरणा” पर्याय निवड
  6. वर नमूद केलेल्या पायऱ्यांचे अनुसरण करा.