Beti Bachao Beti Padhao

महाबँक रूफटॉप सोलर पॅनेल कर्ज योजना

पीएम सूर्यघर : मुफ्त बिजली योजना

अनु. क्र

विषय

पात्रता अटी

(3KW पर्यंत)

पात्रता अटी

(3 KW ते 10 KW वर)

1

उद्देश

ग्रिड कनेक्टेड आरटीएस (रूफ टॉप सोलर) बसवण्यासाठी 3 किलोवॅटपर्यंत कर्ज फक्त निवासी उद्देशासाठी दिले जाते.

ग्रिड कनेक्टेड आरटीएस (रूफ टॉप सोलर) बसवण्यासाठी (३ किलोवॅटपासून पुढे  ते १0 किलोवॅटपर्यंत) कर्ज फक्त निवासी उद्देशासाठी दिले जाते.

2

पात्रता

  • स्वतःच्या नावावर निवासी मालमत्ता असलेल्या आणि त्या घरावर फक्त आमच्या बँकेकडून (इतर कोणत्याही बँक/वित्त पुरवठा संस्थे शिवाय) कर्ज घेतलेले आहे.
  • नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय यांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशांनुसार पुरेसे छप्पर क्षेत्र असावे.

पात्र कर्जदार:-

a) केंद्र/राज्य सरकारचे कायमस्वरूपी पगारदार कर्मचारी/कॉर्पोरेट वेतन खातेधारक/ सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि खाजगी कंपन्यांचे कर्मचारी.

b) केंद्र/राज्य सरकार/सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमचे पेन्शनधारक.

c) स्वयंरोजगार, प्रोफेशनल, व्यावसायिक/स्वतंत्र उद्योजक/शेतकरी ज्यांच्याकडे उत्पन्नाचा नियमित स्रोत आहे.

जर शेतकरी आयकर रिटर्न भरत नसतील तर तहसीलदार /मंडल महसूल अधिकारी/महसूल विभाग अधिकारी यांनी जारी केलेले उत्पन्न प्रमाणपत्र कर्ज मंजूर करण्यासाठी स्वीकारले जाऊ शकते.

3

वार्षिक उत्पन्नाचे निकष:-

किमान वार्षिक उत्पन्नाचे कोणतेही निकष नाहीत.

किमान वार्षिक उत्पन्न – रु. 3.00 लाख 

4

सह-अर्जदार

उत्पन्न जोडण्यासाठी जवळच्या कौटुंबिक संबंधांमध्ये खालीलपैकी फक्त एका सह-अर्जदाराचा विचार केला जाऊ शकतो

  • जोडीदार
  • वडील
  • आई
  • भाऊ
  • मुलगा
  • कन्या
  • बहीण
5

कर्जाची किमान आणि कमाल रक्कम

किमान मर्यादा: रु. 10,000/-

कमाल मर्यादा:  2.00 लाख रु

किमान मर्यादा: रु. 10,000/-

कमाल मर्यादा:  10.00 लाख रु

6

मार्जिन

किमान मार्जिन - प्रकल्प खर्चाच्या 10%.

(प्रकल्पाच्या खर्चामध्ये ग्रिड कनेक्टेड रूफटॉप सोलर फोटोव्होल्टेइक सिस्टीम्सचे डिझाइन, सप्लाय , इन्स्टॉलेशन, टेस्टिंग आणि कमिशनिंग यांचा समावेश आहे.)

किमान मार्जिन - प्रकल्प खर्चाच्या 20%

(प्रकल्पाच्या खर्चामध्ये ग्रिड कनेक्टेड रूफटॉप सोलर फोटोव्होल्टेइक सिस्टीम्सचे डिझाइन, सप्लाय , इन्स्टॉलेशन, टेस्टिंग आणि कमिशनिंग यांचा समावेश आहे.)

7

वित्तपुरवठ्याचे  परिमाण

पुढे नमूद केलेल्या मूल्यांकन पद्धतीवर येणारी सर्वात कमी रक्कम ही कर्जाची कमाल रक्कम असेल.

  1. अनुज्ञेय असलेले वजावटीचे नियम
  2. कमाल अनुज्ञेय असलेल्या मार्जिन चा मानदंड.
  3. कर्जाची विनंती केलेली रक्कम.

योजनेनुसार जास्तीत जास्त कर्जाची रक्कम

8

वय

अर्जदाराचे किमान वय: -21 वर्षे,

कमाल -70- वर्षे (परतफेड कालावधीसह)

9

अनुदान

केंद्र सरकारच्या रूफटॉप सोलर सबसिडी प्रोग्राम आणि रूफटॉप सोलरसाठी आणि कोणत्याही राज्य अनुदान कार्यक्रमांतर्गत लागू असेल ती .

अर्जदाराने रुफटॉप सोलरसाठी राष्ट्रीय पोर्टलमध्ये नोंदणी करावी आणि डिसकॉम  /नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय सोबत नोंदणीकृत/पॅनेल केलेल्या कडून रूफटॉप सोलर खरेदीचे मंजूर प्रकल्प तपशील सादर करावेत.

रूफटॉप सोलर प्लांटची क्षमता

3KW पर्यंत

रूफटॉप सोलर प्लांटची क्षमता

(4KW ते 10KW पर्यंत)

i. 1 KW - रु 30000/-

ii. 2 KW - रु 60000/-

iii. 3 KW - रु 78000/-

अनुदानाची रक्कम – रु 78000/-

  • कर्जदाराने अर्ज करून दावा करायचा आहे (अनुदानाची रक्कम कर्ज खात्यात जमा करण्यासाठी कर्ज खाते क्रमांक प्रदान करायचा आहे)
  • कर्ज खात्याव्यतिरिक्त इतरत्र अनुदान प्राप्त झाल्यास, ते अनुदान कर्ज खात्यात जमा करण्यात येईल याबाबत चे योग्य हमीपत्र कर्जदाराने बँकेस द्यायचे आहे.
  • अनुदान योजनेशी निगडित केंद्र/राज्य सरकारच्या विद्यमान मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे आवश्यक आहे.
10

व्याज दर

बिगर गृहकर्ज कर्जदार आणि गृहकर्ज घेणाऱ्यासाठी)

व्याज दर

प्रभावी व्याजदर

RLLR - 2.30%

7.00%

अर्जदाराचा किमान सिबिल स्कोअर 650 आणि त्याहून अधिक (पूर्वी कर्ज न घेतलेल्या आणि त्यामुळे क्रेडिट स्कोअर नसलेल्या व्यक्ती देखील पात्र आहेत.)

गृहकर्ज नसलेल्या कर्जदारासाठी

सिबिल स्कोअर

व्याज दर

प्रभावी व्याजदर

800 आणि त्याहून अधिक

RLLR + 0.20%

9.50%

750 ते 799

RLLR + 0.50%

9.80%

700 ते 749

RLLR + 0.75%

10.05%

650 ते 699

RLLR + 1.00%

10.30%

गृह कर्ज असलेल्या ग्राहकांसाठी

(गृह कर्जाप्रमाणेच दर)

11

मोरॅटोरियम

6 महिन्यांपर्यंत

12

कर्ज परतफेड कालावधी

मोरॅटोरियम सह 120 महिने

13

प्रक्रिया शुल्क

शून्य

14

खाते हाताळणी शुल्क (दस्तऐवजीकरण, तपासणी/पर्यवेक्षण, NeSL आणि सिबिल शुल्क समाविष्ट आहे)

रु. 500 + 0.20 % कर्ज रक्कम

किमान रु 500/-

कमाल रु 2500/-

15

तारण

प्राथमिक तारण : - खरेदी केलेल्या मालमत्तेचे म्हणजे सोलर रूफ टॉप प्लांट/सेटअप चे हायपोथेकेशन. CERSAI सह हायपोथेकेशन चार्जची नोंदणी केली जाईल.

16

वितरण

नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय द्वारे अनिवार्य केलेल्या सर्व आवश्यक फिजिबिलिटी रिपोर्ट सादर केल्यानंतर थेट व्हेंडर  / ईपीसी कंत्राटदाराला वितरण केले जाईल.

कर्ज खाते क्रमांक कर्जदाराने अथवा व्हेंडर यांनी अनुदानासाठी अर्ज करून दावा करायचा आहे.

17

तत्वतः मंजुरी

  • अर्जदाराच्या स्व-घोषणेवर आधारित डिजिटल तत्त्वतः मंजुरी दिली जाईल. अंतिम मंजुरी संबंधित कागदपत्रांची पडताळणी आणि बँकांनी केलेल्या मूल्यांकनावर आधारित असेल.
  • स्व-स्रोत पद्धतीसाठी तसेच सहाय्यक पद्धतीसाठी चे सर्व अर्ज हे केवळ जन समर्थ प्राप्त आणि प्रक्रिया केले जातील.
18

कर्ज अर्जासाठी लिंक

अर्ज करण्यासाठी https://pmsuryaghar.gov.in वर नोंदणी करा

यशस्वी नोंदणीनंतर, कृपया https://www.jansamarth.in येथे Renewable energy → Apply now येथे अर्ज करा