Last Visited Page  

भारत बिल पेमेंट सर्व्हीस (बीबीपीएस)

भारत बिल पेमेंट सिस्टीम (बीबीपीएस) द्वारा मध्यवर्ती, सहज पोहोचता येणारी आणि अंतर्गत पद्धतीने सर्व क्षेत्रातील ग्राहकांना निश्‍चितपणे, भरवशाची आणि सुरक्षित सेवा देणारी यंत्रणा आहे. याद्वारे ग्राहकांना एजंटस्/रिटेल शॉप्स/बँकेच्या शाखा आणि बँकेचे इंटरनेट बँकिंग, बँकेचे मोबाईल ॲप्स अशा माध्यमातून सेवा देता येते, त्यामुळे कार्ड, यूपीआय, एईपीएस, वॉलेट, कॅश याद्वारे सेवा देऊन व तातडीने त्याबाबत माहिती देते.

यामुळे बिलांचे पेमेंट राखीने करण्याचे प्रमाण कमी होऊन इलेक्ट्रॉनिक पद्धतीकडे अधिक लक्ष दिले जाईल.

सध्या बँक ऑफ महाराष्ट्र पुणे महानगरपालिका (पीएमसी) यांना बीबीपीएस या प्लॅटफॉर्मवर अशी सेवा प्रदान करीत आहे.

बीबीपीएसचे फायदे:

यामुळे ग्राहकांना या यंत्रणेच्या मोठ्या प्रमाणात एजंटांचे नेटवर्क असल्याचा आणि सहज सोप्पा संपर्क पद्धतीचा फायदा घेऊन आपले कोणत्याही प्रकारचे बिल एकाच ठिकाणी भरण्याची सुविधा प्राप्त होते. (ऑनलाईन त्याचप्रमाणे शाखा, बिझनेस कॉरस्पाँडन्स, कस्टमर सर्व्हीस पाँईट, ॲग्रेगेटर्सचे रिटेल एजंट, एटीएम्स (ॲटोमॅटिक टेलर मशीन) किऑस्क इ.)

  • बीबीएसमुळे ग्राहकांना आता लांबलचक रांगांमध्ये उभे राहण्याची गरज नाही.
  • सिंगल फ्लॅटफॉर्मवर अनेक प्रकारची बिले भरण्याची सुविधा.
  • अनेक प्रकारच्या मॉडेल्सद्वारे ग्राहक आपली बिले भरू शकतील (कॅश, डेबिट कार्डस्, वॉलेटस्सह प्रीपेड इन्स्ट्रुमेंट्स आणि अन्य इलेक्ट्रॉनिक पर्याय जसे की, नेट बँकिंग, आयएमपीज आणि एनईएफटी इ.)