Azadi ka Amrit Mahatsav

Last Visited Page  

बचत खाते

पात्रता

कोणी व्यक्ती एकट्याने किंवा संयुक्त असे बचत खाते उघडू शकते. अज्ञान (मुले) व्यक्तींचे खाते संयुक्तपणे नैसर्गिक पालक / कायदेशीर रक्षणकर्ता यांच्या संयुक्त नावाने सुरू करता येते. अर्जदाराने ओळख आणि पत्त्याचा पुरावा खाते सुरू करण्याच्या फॉर्ममध्ये दिल्याप्रमाणे (वैयक्तिक व्यक्तीसाठी सीआयएफ), दोन छायाचित्रे आणि पॅन नंबर / फॉर्म नं. ६०/६१ ही माहिती खाते उघडताना द्यावी. जर एखाद्या ग्राहकास ओळखीसंबंधीचा पुरावा असलेली कागदपत्रे आणि पत्ता बँकेचे समाधान करण्याइतपत देता येत नसेल, तर खाते सध्या बँकेचे ग्राहक असलेल्या कोणत्याही व्यक्तीने जिची केवायसी कागदपत्रे पूर्ण केलेली आहेत आणि खात्याचे कामकाज गेले सहा महिने समाधानकारक आहे. अशा व्यक्तीच्या ओळखीने उघडता येईल.

 

खात्यामधील किमान​ शिल्लक

मासिक सरासरीच्या आधारावर खात्यात शिल्लक ठेवणे आवश्यक आहे. जर मासिक सरासरी शिल्लक खात्यात नसेल तर दर तिमाहीस खातनयावर देखभाल आकार घेण्यात येईल.

 

वारस

वारस नियुक्त करण्याची सुविधा उपलब्ध आहे..

 

व्याज

खात्यात दैनिक आधारावर शिल्लक असलेल्या रकमेवर बँक (म्हणजे रोज असलेल्या शिल्लक रकमेवर) तिमाही आधारावर प्रत्येक वर्षाच्या शेवटी व्याज प्रदान करील.

उपस्थित व्याज दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

 

अन्य लाभ

 • खातेदारास / धारकांना त्‍यांच्या खात्यातून अन्य कोणत्याही खात्यात रक्कम पाठविणे, वीजबिल भरणे, विम्याचा हप्ता भरणे, टेलिफोनचे बील, कर व्याजाचे हप्ते इत्यादी जमा करणे. या संदर्भात बँकेस सूचना देऊन ठेवता येईल. यासाठी लागू होणारा आकार सेवा आकार असेल आणि त्या संदर्भातील माहिती बँकेच्या प्रत्येक शाखेत त्याचप्रमाणे बँकेच्या वेबसाईटवर उपलब्ध असेल.
 • टेलीबँकिंग सुविधा, एसएमएस बँकिंग सुविधा, मोबाईल बँकिंग सुविधा आणि इंटरनेट बँकिंग उपलब्ध आहे.
 • या खात्यावर जमा होणाऱ्या व्याजावर टीडीएस लागू होत नाही.
 • महाबँक व्हिसा एटीएम/डेबिट कार्ड विनामूल्य उपलब्ध आहे.
 • रु. ५.०० लाखांपर्यंत डिपॉझिट इन्शुअरन्स संरक्षण.

 

सेव्हिंग्ज बँक खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

विविध पद्धतीच्या व्यक्तींकरिता बचत खाते उघडण्यासाठी पुढे नमूद करण्यात आलेली कागदपत्रे पडताळणीसाठी दाखविणे आणि बँकेच्या रेकॉर्डसाठी साक्षांकित सत्य प्रती सादर करणे आवश्यक आहे.

वैयक्तिक व्यक्ती

ओळखीचा पुरावा (पुढीलपैकी एक)

 • पासपोर्ट
 • पॅन कार्ड किंवा फॉर्म नं. ६०/६१ (लागू होत असेल त्यानुसार)
 • निवडणूक मतदार ओळखपत्र
 • वाहन चालविण्याचा परवाना
 • राज्य सरकारच्या अधिकार्‍याच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आलेले ‘नरेगा’ ओळखपत्र
 • युनिक आयडेंटीफिकेशन अँथाँरिटी आँफ इंडिया ( यूआयडीएआय ) यांनी जारी केलेले पत्र ज्यामध्ये नाव, पत्ता आणि आधार नंबर यांचा समावेश आहे.
 • ओळखपत्र  (बँकेच्या समाधानाच्या अधीन)
 • बँकेचे समाधान होईल अशा प्रकारे ग्राहकाची ओळख पटविणारे मान्यताप्राप्त प्राधिकरण वा जनसेवक यांचे पत्र.

निवासी पत्त्याचा पुरावा (पुढीलपैकी कोणताही एक)

 • टेलिफोन बिल
 • बँक खात्याचे स्टेटमेंट
 • कोणत्याही मान्यवर जनसेवकाचे प्रमाणपत्र.
 • इलेक्ट्रिसिटी बिल
 • रेशन कार्ड
 • नोकरी देणाऱ्याचे प्रमाणपत्र (बँकेचे मान्य असण्याच्या अधीन)
 • ग्राहकाच्या पत्त्याचा उल्लेख असलेले आणि राज्य सरकारकडे किंवा अन्य प्राधिकरणाकडे नोंदणीकृत असलेले घरभाडे कराराचे ॲग्रीमेंट (करारनामा)

जर फक्त कोणतेही कागदपत्र ओळख आणि पत्त्याचा पुरावा यासाठी पुरेसे असेल तर त्यासाठी अन्य कोणत्याही कागदपत्राची आवश्यकता नाही.

अन्य अतिरिक्त कागदपत्रे पुढे नमूद केल्यानुसार आवश्यक आहेत,

अज्ञानांची खाती

 • न्यायालयाने पालक नियुक्त केला असेल, तर त्यासाठी असलेला न्यायालयाचा आदेश
 • जर पालक अशिक्षित असेल, तर सक्षम प्राधीकरण यांनी जारी केलेली अज्ञान व्यक्तीचा जन्मदाखला.

ट्रस्टस आणि फाऊंडेशन

 • नोंदणीचे प्रमाणपत्र
 • त्यांच्या वतीने व्यवहार करण्यासाठी आवश्यक ती पॉवर ऑफ ॲटॉर्नी.
 • ट्रस्टीज, सेटलर्स, बेनीफिशरीज आणि जे पॉवर ऑफ ॲटॉर्नी धारण करीत आहेत ते, फाऊंडर्स / मॅनेजर्स / डायरेक्टसं यांची ओळख स्पष्ट करणारे कोणतेही कागदपत्र आणि त्यांचे निवासाचे पत्ते.
 • फाऊंडेशन / असोसिएशन यांच्या कार्यकारी मंडळाने केलेले ठराव.
 • टेलिफोन बिल

वरील कागदपत्रांव्यतिरिक्त, खाते उघडण्याचा फॉर्म, ग्राहकाची माहिती देणारा फॉर्म इ. योग्य प्रकारे माहिती भरून आणि साक्षांकित केलेला सादर करणे आवश्यक.

प्रोप्रायरटर्स / पार्टनर्स / डायरेक्टर्स / ट्रस्टीज / ऑथराईज्ड सिग्नेटरीज यांच्या ओळखीचा तसेच पत्त्याचा पुरावा इत्यादी केवायसी नियमांनुसार सादर करणे आवश्यक आहे. तो द्यावा.