|
बँकेच्या हडपसर आणि भिगवण येथील ग्रामीण विकास केंद्रांनी शेतक-यांच्या हिताच्या दृष्टीने विविध विकास कार्यक्रम हाती घेतले आहेत, उदा. प्रयोगशाळा ते भूमी प्रकल्प, क्षारयुक्त मातीचा पुन्हा उपयोग/पुनरुजजीवन आणि अधिकाधिक फलितासाठी मूलभूत सामग्रीच्या शास्त्रीय वापरासंबंधी सल्ला.
महाबँक कृषि संशोधन आणि ग्रामीण विकास प्रतिष्ठान (एमएआरडीइएफ ) विविध उपक्रम शेतक-यांनी हाती घ्यावेत म्हणून त्यांना उत्तेजन देत खेडय़ांच्या सामाजिक-आर्थिक विकासासाठी कार्यरत आहे.. या उपक्रमांमध्ये दुग्धव्यवसाय, एमू पालन, मेंढय़ांची पैदास, द्राक्ष लागवड, बागायत आणि खतांसारख्या विविध सामग्रीच्या शास्त्रीय वापराचा समावेश आहे. हे प्रतिष्ठान शेतक-यांना, विशेषत: लघु आणि अल्पभूधारक शेतक-यांना तत्परतेने बँक क्रेडिट
मिळवून देण्यासाठी सहाय्य करते.
स्वयंरोजगारासाठी ग्रामीण युवकांना आणि महिलांना विशेष कौशल्य आत्मसात करणं शक्य व्हावं म्हणून प्रशिक्षण देण्यासाठी बँकेने पाच महाबँक स्वयं रोजगार प्रशिक्षण संस्था पुणे, औरंगाबाद, नागपूर, नाशिक आणि अमरावती येथे स्थापन केल्या आहेत. या संस्थांतर्फे स्वयंरोजगाराची कौशल्ये ग्रामीण युवक आणि स्त्रियांना आत्मसात करणे शक्य व्हावे म्हणून प्रशिक्षण देण्यात येते. या संस्थांतर्फे आजपर्यंत 4605 उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य रोजगार प्रशिक्षण संस्था (एमएसइटीआय) - वार्षिक प्रशिक्षण कार्यक्रम
बँक ऑफ महाराष्टखने 1989 मध्ये उभारलेली स्वयंसेवी संस्था - ग्रामीण महिला व बालक विकास मंडळ - स्वयंसेवी गटांची उभारणी, संवर्धन, प्रशिक्षण आणि बँक पतसुविधेशी त्यांचा दुवा जोडणे, या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागी आहेत. ग्रामीण महिला व बालक विकास मंडळ, स्व-मदत गटांच्या उत्पादनाच्या विक्रीसाठी
, सावित्री या नावानं पुणे शहरात स्थापन केलेल्या दोन केंद्रांव्दारे स्वमदत गटांना मदतही करते. बँकेची ही स्वयंसेवी संस्था, दर्जेदार कच्चा माल-सामग्री मिळवून देणे- खरेदी आणि गुणवत्तापूर्ण उत्पादन, नंतर त्याचे विपणन व विक्री यासाठी स्व-मदत गटांना सक्रिय सहाय्य आणि मार्गदर्शन करते. प्रगल्भ स्व-मदत गटांचे आधुनिकीकरण करुन त्यांचे रुपांतर लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये करण्यासाठीही सहाय्य देण्यात येते. महाराष्टख शासनाने ग्रामीण महिला व बालक विकास मंडळाला मातृ-स्वयंसेवी संस्था म्हणून मान्यता दिली आहे.
महाबँक विदर्भ शेतकरी जागृती अभियान हा एक बँक ऑफ महाराष्टख आणि हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ यांचा संयुक्त उपक्रम आहे. या उपक्रमान्वये विदर्भातील सहा जिह्यांमधील 5750 हून अधिक शेतक-यांशी सल्ला आणि प्रशिक्षणाव्दारे सुसंवाद साधण्यात आला आहे.
|