बँक ऑफ महाराष्ट्र,
केंद्रीय कार्यालय,
1501,लोकमंगल,
शिवाजीनगर, पुणे 411 005
परदेशातून चीप फंडसचे बनावट प्रस्ताव - जागरुकता मोहीम
विदेशी चलनातील चीप फंडसच्या बोगस योजनांसंबंधी भूलथापांच्या स्वरुपातील माहिती प्रसृत करण्याच्या वाढत्या प्रकारांबद्दल सावधगिरीची सूचना जनतेस आणि आमच्या सन्माननीय गऎाहकांना देण्यात येत आहे. पत्रे, भुलवणा-या योजना, बक्षिसे, बनावट योजना, लॉट-या इत्यादी `रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया` च्या असल्याचे आभास निर्माण करणारे एसएमएस काही लोकांना लक्ष्य करुन पाठवले जात आहेत. बक्षिसाची रक्कम मिळण्याआधीचे सोपस्कार म्हणून असे भामटे प्रकिया शुल्क/टॅक्स क्लिअरन्स आकार/रुपांतर आकार/वटणावळ आकार इत्यादी प्रकारे पैसा गोळा करतात. अशा भूलथापांच्या स्वरुपातील योजनांना बळी पडू नये अशी सावधगिरीची सूचना जनतेस आणि आमच्या सन्माननीय गऎाहकांना देण्यात येत आहे.
उप-सरव्यवस्थापक (माहिती तंत्रज्ञान ) ,
बँक ऑफ महाराष्ट्र ,
1501, शिवाजीनगर,
पुणे - 411 005 |