अनिवासी भारतीय सेवा
अनिवासी साधे खाते अनिवासी बाह्य खाते एफसीएनआर ए/सी आरएफसी ए/सी इनवर्ड रेमिटन्स केंद्र
अनिवासी साधे खाते
  • रुपी चेकींग खाती म्हणजेच रुपी बचत खाते किंवा रुपी चालू खाते आणि रुपी मुदत ठेव खाते अशा स्वरुपात उघडता येतात. हे खाते भारतीय रुपीमध्ये चालवले जाईल.
  • अनिवासी भारतीय आणि भारतीय वंशाच्या व्यक्ती या प्रकारचे खाते उघडू शकतात.
  • एखादी व्यक्ती अनिवासी झाल्यावर त्या व्यक्तीच्या त्या आधीच्या रुपी खात्याचे अनिवासी साधारण खात्यात रुपांतर होते. ही खाती अनिवासी भारतीयांसाठी असतात आणि जागेच्या भाडय़ासारखी स्थानिक पातळीवरची येणी जमा व्हावीत यासाठी त्यांना या खात्यांची गरज असते.

खात्यांचे प्रकार

या योजनेअन्वये चालू, बचत, पुनरावर्ती आणि मुदत ठेव अशी सर्व प्रकारची खाती उघडता येतात.

  • संयुक्त खाती :
    इतर अनिवासी भारतीय किंवा भारतीय रहिवाशांबरोबर हे खाते संयुक्तपणे उघडता येते.
  • खाते उघडणे :
    हे खाते पुढील प्रकारच्या रकमा भरुन उघडता येते :
    • परदेशातून पाठवल्या जाणा-या रकमा,
    • खातेधारकाच्या तात्पुरत्या भेटीदरम्यान मिळालेले प्रवासी धनादेश/नोटा/परकीय चलनातील उत्पन्न,
    • ड्राफ्टस/वैयक्तिक धनादेशातून येणारे उत्पन्न,
    • त्याच व्यक्तीच्या सध्याच्या एफसीएनआर/एनआरइ खात्यांमधून रकमांचे स्थलांतरण
    • रुपयांमधील कायदेशीर व्यवहार असलेल्या स्थानिक स्त्रोतांमधून येणा-या रकमा
  • या खात्यांमध्ये जमा झालेल्या रकमा परत न पाठवता येणा-या (नॉन-रिपॅट्रीबल) असतात, त्यांना अपवाद पुढीलप्रमाणे :
    • त्यांच्या मुलांच्या शिक्षणाच्या खर्चाची पूर्तता करण्यासाठी प्रति शैक्षणिक वर्षी 30,000/- अमेरिकन डॉलर्स पर्यंत,
    • त्यांच्या कुटुंबाच्या सदस्यांच्या किंवा खातेधारकांच्या परदेशातील वैद्यकीय खर्चाची पूर्तता करण्यासाठी 1,00,000 अमेरिकन डॉलर्सपर्यंत,
    • किमान दहा वर्षाच्या कालावधीसाठी त्यांच्या ताब्यात असलेल्या स्थावर मालमत्तेच्या विक्रीचे उत्पन्न प्रति वर्षी 1,00,000 अमेरिकन डॉलर्सपर्यंत,
    • भाडे, लाभांश, निवृत्तीवेतन, व्याज इ. तसेच निव्वळ लागू कर यासारखे चालू उत्पन्न.

परमिटेड क्रेडिट - संमत पत

खातेधारकाची भारतातील कायदेशीर येणी किंवा स्थलांतरित रकमा किंवा भारतातील तात्पुरत्या भेटीदरम्यान खातेधारकाने भरलेल्या परकीय चलनी नोटा किंवा साधारण बँकींग चॅनलव्दारे भारताबाहेरुन आलेल्या रकमांमधील उत्पन्न

परमिटेड डेबिट

  1. गुंतवणुकीच्या पेमेंटसह रुपयांमधील सर्व स्थानिक पेमेंट, केवळ आरबीआय नियमावलींची पूर्तता झाली असेल तरच
  2. भारतातील चालू उत्पन्न भारताबाहेर पाठवणे - निव्वळ लागू कर

व्याज दर

या खात्यांमधील व्याज दर देशांतर्गत दरांप्रमाणेच असतात.

आय कर

या ठेवींवर मिळालेल्या व्याजाला आयकराच्या चालू दराप्रमाणे ऍट सोर्स डिडक्शन पध्दत लागू असेल.
Presentation to Analysts Financial Results March 2012
 
अकौऊंट पोर्टेबिलिटी (खाते स्थलांतरण) बँकेच्या एका शाखेतून दुस-या शाखेत खात्याचे स्थलांतरण
 
व्हिसा डेबिट कार्ड वापराअन्वये ऑफर
 
Bank's Codes of Commitments to Customers
 
नव्या रिकरिंग ठेवी योजना महामिलियनोअर, महालखपती आणि महासंचय सिस्टीमॅटीक डिपॉझिट प्लॅन आरडी योजना
 
बचत खात्यातील ठेवींवरील व्याज रकमा देण्याच्या तारखेत बदल
 
सेवा शुल्क
 
23 मार्च, 2011 रोजी 'बँक ऑफ महाराष्ट्र'च्या समभागधारकांची विशेष सर्वसाधारण सभा.
 
०१.११.२०११ पासूनचे सुधारित आरटीजीएस आकार
 
एलेक्ट्रोनिक अंतर्गामी (इनवर्ड) व्यवहार 01.01.2011 पासून पैसे पाठवणा-याने दिलेल्या लाभार्थीच्या खाते क्रमांक माहितीच्या आधारेच केवळ आरटीजीएस, एनइएफटी, एनइसीएस, इसीएस व्दारे केले जातील.
 
महाबँक ज्युवेल कर्ज योजना - सोन्याच्या दागिन्यांच्या तारणावर कर्ज
 
विविध गरजांची पूर्तता करण्यासाठी गृह कर्जदारांसाठी `टॉप अप' कर्ज
 
`भारतीय विशेष व्यक्तित्वनिश्चिती मंडळा'बरोबर बँकेचा सहकार्य करार
 
देशांतर्गत मुदत ठेवींवरील व्याज