|
रकमा पाठवण्याची/इनवर्ड रेमिटन्सची पध्दत अगदी सुलभ आहे. तुमच्या बँकरना सूचना देणे एवढेच काम करावे लागते (रक्कम पाठवण्याच्या देशात, उदा. यूएसए ) ही पध्दत पुढीलप्रमाणे आहे :
Remit USD--- to BANK OF NEW YORK, NEW YORK (SWIFT CODE IRVTUS3N) for credit to A/c No. 803-3165-537 of BANK OF MAHARASHTRA, Mumbai for further credit to NRE A/c No. --- of ---- with ---- Branch, ---- India.
बँक ऑफ महाराष्टख चा स्विफ्ट कोड आहे "MAHBINBB". रकमा त्वरित आणि सुरक्षितरित्या पाठवणे सुलभ व्हावे म्हणून जगभरातील 18 बँकांमध्ये आम्ही आमची खाती चालवतो. या प्रतिनिधी बँकांची यादी, त्यांचे पत्ते आणि आमच्या खात्याच्या तपशिलांचा समावेश रेमिटन्स संदेशात असतो :
- परदेशातील आमच्या प्रतिनिधी बँकेचे नाव आणि पत्ता आणि त्यानुसार असलेला स्विफ्ट कोड
- आवश्यक ती रक्कम
- सोबत जोडलेल्या यादीत उल्लेख केल्याप्रमाणे आमचा खाते कऎमांक
- तुमचे नाव आणि खात्याचे तपशील
- तुमचे खाते असलेल्या आमच्या बँकेच्या शाखेचे नाव
आमच्याकडे खाते उघडण्यासाठी खाते उघडण्याचा फॉर्म डाऊनलोड करुन घेऊन तो भरुन झाल्यावर आमच्या कुठल्याही शाखेत सादर करावा लागतो.
कृपया हा फॉर्म आणि पासपोर्ट प्रती भारतीय वकिलात/हाय कमिशन/कॉन्सुलेट नोटरी/सध्याचे बँकर यांच्याकडून साक्षांकित - ऍटेस्ट - करुन घ्यावा.
|