- हे खाते अनिवासी भारतीय (एनआरआय ) आणि परदेशी कॉर्पोरेट बॉडीजना (ओसीबी )उघडता येते.
- हे खाते अनिवासी खातेदाराने स्वत:च उघडणे आवश्यक असते, भारतातील कुलमुखत्यारधारकाला खाते उघडता येत नाही.
- ही खाती मुदत ठेव खाती असतात आणि त्यांची किमान मुदत एक वर्ष असते. ही मुदत एक वर्ष ते तीन वर्षांची असते. हे खाते विदेशी चलनात चालवणे आवश्यक असते. ठेवींवरील व्याज हे केवळ विदेशी चलनातच असेल.
- हे खाते दुस-या अनिवासी व्यक्तीबरोबर संयुक्तपणे उघडता येते. मात्र सर्व खातेधारक भारतीय राष्ट्रीयत्व किंवा वंशाच्या व्यक्ती असाव्या लागतात. भारतीय रहिवाशासह खाते उघडण्यास परवानगी नसते.
- खाते उघडणे :
- परदेशातून पाठवल्या जाणा-या रकमा,
- खातेधारकाच्या तात्पुरत्या भेटीदरम्यान मिळालेले प्रवासी धनादेश/नोटा/परकीय चलनातील उत्पन्न,
- ड्राफ्टस/वैयक्तिक धनादेशातून येणारे उत्पन्न,
- त्याच व्यक्तीच्या सध्याच्या एफसीएनआर/एनआरइ खात्यांमधून रकमांचे स्थलांतरण
प्रत्यावर्तन - रिपॅट्रीएशन
या खात्यातील रकमा त्यांच्यावरील व्याजासह पूर्णपणे प्रत्यावर्तनीय असतात.
संयुक्त खाते
दोन किंवा अधिक अनिवासी भारतीयांनाच केवळ हे खाते संयुक्तपणे उघडता येते. भारतीय रहिवाशाबरोबर संयुक्त खाते उघडता येत नाही.
करविषयक लाभ
या ठेवींवर व्याजाच्या रुपाने मिळणा-या उत्पन्नाला आयकरातून सूट मिळते. या खात्यातील बॅलन्सला संपत्ती कर लागू होत नाही.
नामांकन सुविधा
एफसीएनआर (बी ) अखात्यांसाठी नामांकन सुविधा उपलब्ध असते.
खात्यातील रकमांविषयक व्यवहार
खालील पध्दतींनी एफसीएनआर ठेव खाते उघडता येते :
- परदेशातून पाठवल्या जाणा-या रकमा,
- परकीय चलनातील नोटांच्या स्वरुपातील उत्पन्न,
- प्रवासी धनादेश/वैयक्तिक धनादेश/ड्राफ्टस,
- सध्याच्या एनआरइ/ एफसीएनआर खात्यातून पाठवल्या जाणा-या रकमा
भारतात परतणा-या भारतीयांसाठी सुविधा
- परदेशात सलग किमान एक वर्ष वास्तव्य केलेल्या एनआरआय व्यक्तींना भारतात कायमच्या वास्तव्यासाठी परत आल्यानंतरही 9 वर्षांच्या कालावधीसाठी परदेशातील बँकेतील ठेवी, शेअर्स, रोखे, व्यवसाय आणि स्थावर मालमत्तेतील गुंतवणूक कायम ठेवता येते.
- भारतीय रहिवाशांचे विदेशी चलन खाते (रेसिडेंट फॉरेन करन्सी अकाऊंट) उघडण्यास पात्र
- परदेशात सलग किमान एक वर्ष वास्तव्य केलेल्या एनआरआय व्यक्तींना भारतात कायमच्या वास्तव्यासाठी परत आल्यानंतरही भारतातील बँकांमध्ये भारतीय रहिवाशांचे विदेशी चलन खाते उघडता येते. एक वर्षापेक्षा कमी काळ परदेशात वास्तव्य करुन भारतात परतणा-या एनआरआयना अशी खाती उघडण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची परवानगी घ्यावी लागते.
|