अनिवासी भारतीय सेवा
अनिवासी साधे खाते अनिवासी बाह्य खाते एफसीएनआर ए/सी आरएफसी ए/सी इनवर्ड रेमिटन्स केंद
 
अनिवासी बाह्य खाते (एनआरइ ए/सी )
  • हे खाते स्वत: अनिवासी खातेधारकाने उघडणे आवश्यक आहे, भारतातील कुलमुखत्यारधारकाला असे खाते उघडता येणार नाही.
  • हे खाते रुपयांमध्ये चालवले जाईल. बचत, चालू, पुनरावर्ती आणि मुदत ठेवी इत्यादींसारख्या कोणत्याही प्रकारे हे खाते चालवता येईल.
  • असे खाते संयुक्तपणे अन्य अनिवासी व्यक्तींबरोबर उघडता येते, मात्र सर्व खातेधारक व्यक्ती भारतीय राष्ट्रीयत्व किंवा वंशाच्या असणे आवश्यक असते. भारतीय रहिवासी व्यक्तीसह खाते उघडता येत नाही.
  • खाते उघडणे
    1. परदेशातून पाठवल्या जाणा-या रकमा,
    2. खातेधारकाच्या तात्पुरत्या भेटीदरम्यान मिळालेले प्रवासी धनादेश/नोटा/परकीय चलनातील उत्पन्न,
    3. ड्राफ्टस/वैयक्तिक धनादेशातून येणारे उत्पन्न,
    4. त्याच व्यक्तीच्या सध्याच्या एफसीएनआर/एनआरइ खात्यांमधून रकमांचे स्थलांतरण

प्रत्यावर्तन - रिपॅट्रीएशन

या खात्यातील रकमा त्यांच्यावरील व्याजासह पूर्णपणे प्रत्यावर्तनीय असतात,

कुलमुखत्यारपत्र

एनआरइ खात्यासाठी द्यावयाचे कुलमुखत्यारपत्र स्थानिक व्यक्तीला स्थानिक रकमा स्वीकारणे-देणे, योग्य ती गुंतवणूक करणे याची परवानगी देत देता येते.

करांसंबंधीचे लाभ

या ठेवींवर व्याजाच्या रुपाने मिळणा-या उत्पन्नाला आयकरातून सूट मिळते. या खात्यातील बॅलन्सला संपत्ती कर लागू होत नाही.

नामांकन सुविधा

एनआरइ खात्यांसाठी नामांकन सुविधा उपलब्ध असते.

परमिटेड क्रेडिट - संमत पत

विदेशी चलनातील धनादेशाच्या स्वरुपातील उत्पन्न, ड्राफ्ट, प्रवासी धनादेश, विदेशी चलनातील परदेशातून येणा-या रकमा, सध्याच्या एनआरइ/एफसीएनआर खात्यातून येणारे उत्पन्न, सरकारी रोख्यांवरील व्याज आणि यूटीआयचा लाभांश, तसेच शेअर्स आणि डिबेंचर्समधील अन्य गुंतवणूक - यासाठी ही गुंतवणूक मात्र एनआरइ/एफसीएनआर खात्यातून डेबिट करुन करावी लागते.

परमिटेड डेबिटस

स्थानिक संवितरित रकमा - डिसबर्समेंटस, भारताबाहेर पाठवल्या जाणा-या रकमा, स्वत:च्या खात्याच्या एनआरइ/एफसीएनआर मध्ये हस्तांतरित होणा-या रकमा. सध्याच्या नियमावलीनुसार कोणत्याही भारतीय कंपनीचे शेअर्स/रोखे/कर्जरोखे यातील गुंतवणुकी.
Presentation to Analysts Financial Results March 2012
 
अकौऊंट पोर्टेबिलिटी (खाते स्थलांतरण) बँकेच्या एका शाखेतून दुस-या शाखेत खात्याचे स्थलांतरण
 
व्हिसा डेबिट कार्ड वापराअन्वये ऑफर
 
Bank's Codes of Commitments to Customers
 
नव्या रिकरिंग ठेवी योजना महामिलियनोअर, महालखपती आणि महासंचय सिस्टीमॅटीक डिपॉझिट प्लॅन आरडी योजना
 
बचत खात्यातील ठेवींवरील व्याज रकमा देण्याच्या तारखेत बदल
 
सेवा शुल्क
 
23 मार्च, 2011 रोजी 'बँक ऑफ महाराष्ट्र'च्या समभागधारकांची विशेष सर्वसाधारण सभा.
 
०१.११.२०११ पासूनचे सुधारित आरटीजीएस आकार
 
एलेक्ट्रोनिक अंतर्गामी (इनवर्ड) व्यवहार 01.01.2011 पासून पैसे पाठवणा-याने दिलेल्या लाभार्थीच्या खाते क्रमांक माहितीच्या आधारेच केवळ आरटीजीएस, एनइएफटी, एनइसीएस, इसीएस व्दारे केले जातील.
 
महाबँक ज्युवेल कर्ज योजना - सोन्याच्या दागिन्यांच्या तारणावर कर्ज
 
विविध गरजांची पूर्तता करण्यासाठी गृह कर्जदारांसाठी `टॉप अप' कर्ज
 
`भारतीय विशेष व्यक्तित्वनिश्चिती मंडळा'बरोबर बँकेचा सहकार्य करार
 
देशांतर्गत मुदत ठेवींवरील व्याज