इंटरनेट बँकींग का?
बँक ऑफ महाराष्ट्र इंटरनेट व्दारे पुढील सेवा देत आहे. तुम्ही इंटरनेट संधानाचा उपयोग करून घेऊन तुमच्या घरून या सुविधेचा लाभ घेऊ शकता, एक प्रकारे बँकींग आता तुमच्या घरातूनच तुम्हाला करता येईल.
- खात्यावरील शिल्लक रकमेबाबत चौकशी
- खात्यावरील सर्व व्यवहाराच्या नोंदी/स्टेटमेंट ऑफ अकौंटस
- सर्व प्रकारच्या खात्यांसाठी अकौंट तपशील बघता येतात.
- मिनी स्टेटमेंट
- धनादेशाच्या परिस्थितीची चौकशी
- धनादेश पुस्तिकेबद्दल असलेले प्रश्न
- करांच्या रकमा इंटरनेटवरून भरणे
महाकनेक्टसाठी अर्ज कसा करायचा (इंटरनेट बँकींग)?
इंटरनेट बँकींगसाठी bankofmaharashtra.in या वेबसाईटवरून अर्ज डाऊनलोड करुन घ्या किंवा बँकेच्या शाखेतून अर्ज घेऊन तो व्यवस्थितरित्या भरुन शाखेत सादर करा. ह्या अर्जावरील प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्यावर तुम्हाला यूजर आयडी, महाकनेक्टला लॉगइन करण्यासाठी पासवर्ड आणि व्यवहारासाठीचा पासवर्ड देण्यात येईल. हा यूजर आय डी आणि पासवर्ड वापरत तुम्हाला महाकनेक्टला लॉग इन करता येईल आणि इंटरनेट बँकींग सुविधेचा लाभ घेता येईल.
अर्जाचे नमुने डाऊनलोड करुन घ्या :
महाकनेक्ट (इंटरनेट बँकींग) वेबसाईट सुरु कशी करायची ?
इंटरनेटशी संधान साधा आणि तुमच्या कॉम्प्युटरवरील वेब ब्राऊझर उघडा. ब्राऊझरच्या पत्त्याच्या स्तंभात https://www.mahaconnect.in टाईप करा. इंटरनेट बँकींग वेबसाईटशी संपर्क साधण्याचा हा सगळ्यात सुरक्षित प्रकार असतो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या इंटरनेट बँकींगकडे नेऊ पाहणा-या कोणत्याही लिंकचा उपयोग करू नका. अगदी सर्च इंजिनच्या परिणामांचाही उपयोग करू नका.
लॉग-इन कसे करायचे ?
तुम्हाला दिलेला यूजर आय डी आणि पासवर्ड लॉगइन पानावर दिलेल्या पासवर्ड फिल्ड आणि कस्टमर आयडी मध्ये भरा. तुम्ही पहिल्यांदाच लॉग इन करत असाल तर सिस्टम तुम्हाला अटी आणि शर्तींचा दस्तऐवज दाखवेल, ठआय ऍग्री लिंकवर क्लिक करुन तुम्ही अटी आणि शर्ती स्विकारणे आवश्यक असते. त्यानंतर सिस्टम सुरुवातीचा लॉगइन आणि टॅन्जॅक्शन पासवर्ड बदलायला तुम्हाला भाग पाडेल. यशस्वी लॉग-इन झाल्यानंतर तुम्ही मेन्यू आणि तुमची अकाऊंट बघू शकता.
सुरक्षिततेच्या दृष्टीने दिलेल्या सूचना :
- सायबर कॅफे किंवा समान कॉम्प्युटरवरुन इंटरनेट बँकींग अकौंटशी संधान साधू नका.
- इंटरनेट बँकींगचं काम संपल्यावर योग्य पध्दतीने लॉग-ऑफ करा. तुमचा केवळ ब्राऊझर बंद करु नका.
- वेबसाईटकडे नेणा-या कोणत्याही लिंकवर क्लिक करु नका. तुमच्या ब्राऊझरच्या ऍड्रेस बारमध्ये अचूक असा URL (https://www.mahaconnect.in) टाईप करा.
- तुमच्या ब्राऊझरचे - ऑटो कमप्लिट - कार्य बंद करा.
- इतरांना ओळखणे अवघड आणि गुंतागुतीचे व्हावे असा तुमचा पासवर्ड करण्याच्या दृष्टीने अक्षरे, संख्या आणि विशा चिन्हे वापरावीत.
- तुमचे इंटरनेट बँकींग पासवर्ड कोणालाही सांगू नका, कोणाबरोबरही वापरु नका.
- पिन, पासवर्ड किंवा खाते क्रमांक अशी गुप्त माहिती विचारणा-या कोणत्याही मेलला प्रतिसाद देऊ नका.
- तुमच्या इंटरनेट बँकींग अकाऊंटचा शेवटचा लॉगइन नेहमीच तपासून पहा.
- वेब पेजचा URL तपासून पहा. वेब ब्राऊझ करत असताना URL ची सुरुवात "http" ने होते. तरीसुध्दा सुरक्षित संपर्क झाल्यावर समोर येणारा पत्ता http ने सुरु व्हावा, शेवटी असलेला ए लक्षात घ्यावा.
काय करायचे आणि काय करायचे नाही, यासंबंधीच्या सूचना :
- तुमच्या आवडत्या साईटसच्या यादीत महाकनेक्टचाही समावेश करा. तुमच्या आवडत्या यूआरएलमध्ये https://www.mahaconnect.in या यूआरएलचा समावेश करा.
- अधूनमधून तुमचा पासवर्ड बदलत रहा. तुमचा पासवर्ड नियमितपणे अधूनमधून म्हणजेच निदान तीस दिवसांनी बदलत रहावा अशी आमची शिफारस आहे. तुमचा पासवर्ड बदलण्यासाठी https://www.mahaconnect.in ला लॉग इन करा. ठऑप्शन्स? चेंज लॉग इन पासवर्डठ क्लिक करा. ट्रन्जॅक्शन पासवर्ड बदला.
- योग्य पद्धतीने लॉग आऊट : तुमचे ऑनलाईन बँकींगचे काम झाल्यावर प्रत्येक वेळी महाकनेक्टपासून लॉग आऊट करा. योग्य त्या पध्दतीने लॉग आऊट केल्याशिवाय तुमचा ब्राऊजर थेट बंद करु नका.
- कोणतीही गंभीर स्वरुपाची माहिती कॉम्प्युटरमध्ये भरण्याआधी साईट सिक्युअर मोडमध्ये चालू असल्याची खात्री करुन घेण्यासाठी ब्राऊजरच्या खालच्या बारवरील पॅडलॉक चिन्हाकडे लक्ष द्या.
- तुमचे इंटरनेट बँकींग पासवर्ड गुप्त ठेवा. कोणत्याही माध्यमाव्दारे (इ-मेल किंवा फोन इत्यादी) तुमच्या इंटरनेट बँकींग पासवर्डची चौकशी बँक ऑफ महाराष्टृचे अधिकारी कधीही करणार नाहीत याची हमी आम्ही देतो.
- अनावश्यक आर्थिक कागदपत्रे ताबडतोब नष्ट करा. पिन किंवा पासवर्ड मेलर लक्षात ठेवल्यावर ताबडतोब नष्ट करा, तसेच ते कुठेही लिहून ठेवू नका.
- तुमच्या ब्राऊजरवरील - ऑटो कमप्लिट -चे काम बंद करा. तुम्ही इंटरनेट एक्स्प्लोरर वापरत असाल तर पासवर्ड, सिस्टमने लक्षात ठेवू नये म्हणून तुमच्या ब्राऊजरवरील - ऑटो कमप्लिट -चे काम बंद करा. ऑटो कमप्लिट -चे काम बंद करण्यासाठी पुढील उपाय योजावेत :
- इंटरनेट एक्स्प्लोरर उघडा. सिलेक्ट टूल्स? इंटरनेट ऑप्शन्स? कंटेट (टॅब)
- ऑटो कमप्लिट विभागाखालील सेटींग्ज बटन क्लिक करा.
- फॉर्म्स चेक बॉक्सवरील पासवर्ड आणि यूजर नेम्स डि-सिलेक्ट करा.
- ओके वर क्लिक करा.
- असुरक्षित ठिकाणी तुमची व्यक्तिगत माहिती राहू देऊ नका. तुमची धनादेश पुस्तके, पासबुके, ठेव पावत्या सुरक्षित ठिकाणी राहतील याची नेहमी खात्री करुन घ्या.
- अज्ञात स्त्रोतांकडून प्रोग्रॅम डाऊनलोड करणे टाळा. तुमच्या कॉम्प्युटरची सुरक्षितता धोक्यात येतील असे स्पायवेअर किंवा व्हायरसेसचे गुप्त प्रकार काही स्त्रोतांमध्ये असतील.
- प्रेषक माहिती नसेल तर मेलव्दारे पाठवलेली ऍटॅचमेंट उघडू नका.
- . exe, .pif, .vbs अशी जोडणी - एक्सटेन्शन असलेल्या इ-मेलसोबतच्या फायली कधीही उघडू नयेत. अशा फायली नेहमीच धोकादायक असतात.
- कॉम्प्युटर वापरात नसेल तर तुमचा कॉम्प्युटर ऑनलाईन ठेवू नका. तुमचा कॉम्प्युटर बंद तरी ठेवा किंवा कॉम्प्युटरचा इंटरनेटशी संपर्क राहू देऊ नका.
- कॉम्प्युटर कोणाबरोबर विभागून वापरु नका. www.mahaconnect.in शी सार्वजनिक/विभागून वापरल्या जाणा-या कॉम्प्युटरवरुन (उदा. सायबर कॅफे) संपर्क साधू नये.
|