लघु-मध्यम उद्योगांसाठी असलेली कार्यपध्दती
  • लघु-मध्यम उद्योगांना कर्जपुरवठा करण्याच्या बाबतीत व्यावसायिक, कार्यक्षम, कुशल आणि गतिमान सेवा देणे
  • विचारात घेतलेल्या पत सुविधा - मुदतीची कर्जे, कॅश केऎडिट, बँक गॅरंटी आणि लेटर ऑफ क्रेडिट
  • लघु-मध्यम उद्योगांना पत सुविधा मिळवण्यासाठी करावे लागणारे अर्ज सुलभ आणि दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
  • पूर्ण पध्दतीने भरलेल्या कर्जाच्या अर्जांना योग्य ती पोचपावती दिली जाते.
  • कर्जाच्या अर्जांवरची कार्यवाही करण्यासाठी असलेले वेळेचे निकष :
    अ. रु.25,000/- पर्यंत                                                  :2 आठवडे
    ब. रु.25,000/- पासून रु.5.00 लाखापर्यंत                          :4 आठवडे
    क. रु.5.00 लाखांपेक्षा जास्त                                           :8-9 आठवडे
  • लघु-मध्यम उद्योगांना रु.5.00 लाखांपर्यंतची समान-तारण (कोलॅटरल ) मुक्त कर्जे
  • समाधानकारक व्यवहार आणि आर्थिक स्थिती असलेल्या, रु.100.00 लाखांपर्यंतच्या समान तारण/ त्रयस्थ पक्ष हमीशिवाय मंजूर झालेली कर्जे लघु-मध्यम उद्योगांसाठी असलेल्या पत हमी निधी योजनेखाली - क्रेडिट गॅरंटी टखस्ट फंड स्कीम फॉर मायक्रो अँड स्मॉल एंटरप्रायझेस - (सीजीटीएमएसइ ) येतात.

क्रेडिट गॅरंटी  फंडस स्कीमअन्वये असलेल्या ऍडव्हान्सेसकरिता, 5 वर्षांच्या कालावधीसाठी मंजूर झालेल्या पत सुविधेच्या 1.50% हमी शुल्क (बँकेची जबाबदारी ) आणि दर वर्षी 31 मार्च रोजी थकित रकमेच्या 0.75% वार्षिक सेवा शुल्क (वार्षिक सेवा शुल्काच्या 50%  रक्कम - बँकेची जबाबदार ) भरावे लागते.
हा टखस्ट पुढीलप्रमाणे हमी देतो  :

वर्ग पतसुविधांच्या बाबतीत असलेल्या हमीची कमाल मर्यादा
  रु.5.00 लाखांपर्यंत रु.5.00 लाख ते रु.50.00 लाखरु. रु.50 लाख ते रु.100 लाख
अतिलघु उद्योग जास्तीत जास्त रु.4.25 लाखांपर्यंत नियमानुसार रकमेच्या 85% जास्तीत जास्त रु.37.50 लाखांपर्यंत नियमानुसार रकमेच्या 75% रु.62.50 लाखांच्या एकूण मर्यादेनुसार रु.50 लाखांवर नियमानुसार रकमेच्या रु.37.50 लाख + 50%
स्त्री उद्योजक/ईशान्यक्षेत्रातील उद्योग(सिक्कीमसह ) जास्तीत जास्त रु.40.00 लाखांपर्यंत नियमानुसार रकमेच्या 80% रु.65 लाखांच्या एकूण मर्यादेनुसार रु.50 लाखांवर नियमानुसार रकमेच्या रु.40.00 लाख + 50%
कर्जदारांचे सर्व प्रकारचे वर्ग जास्तीत जास्त रु.37.50 लाखांपर्यंत नियमानुसार रकमेच्या 75% रु.62.50 लाखांच्या एकूण मर्यादेनुसार रु.50 लाखांवर नियमानुसार रकमेच्या रु.37.50 लाख + 50%
  • मुदतीची कर्जे देणा-या संस्थांवरील व्यावसायिकांचे अवलंबित्व कमी करण्यासाठी लघु-मध्यम उद्योगांना रु.100.00 लाखांपर्यंत संमिश्र कर्ज मंजूर केले जाते.
  • कर्ज प्रमाण : अपेक्षित वार्षिक विक्रीच्या उलाढालीच्या 20 % (नायक समिती निकष )
  • उपलब्ध लाभदायक मार्जिन - अंतर - पुढीलप्रमाणे :
    रु.25,000/- पर्यंत          : काहीही नाही
    रु.25,000/- वरील        :25%
  • लघु उद्यमी क्रेडिट कार्ड : या कार्डव्दारे रु.10.00 लाखांपर्यंत तणावमुक्त क्रेडिट दिले जाते.
  • महाबँकेचे कारागिरांसाठी असलेले क्रेडिट कार्ड : रु.2.00 लाखांपर्यंतचे क्रेडिट - कारागिरांसाठी. व्यवसायाच्या स्वरुपाचा विचार करुन रोखीच्या स्वरुपात पैसे दिले जातात.
  • वित्तसहाय्य अतिशय आकर्षक व्याजदरांनी उपलब्ध केले जाते. या वित्तसहाय्याची रचना पुढीलप्रमाणे
I] अतिलघु आणि लघु उद्योगांना रु.25.00 लाखांपर्यंतच्या एकूण मर्यादेचे (फंड + नॉन फंड ) ऍडव्हान्सेस :

वर्गवारी

व्याज दर

अ ) सर्व नव्या खात्यांसाठी आधार दर + 1.25 %  (सध्या 9.50 % )
ब ) अजून पूर्ण व्हायच्या अवस्थेत असलेल्या
सध्याच्या अतिलघु-लघु-मध्यम खात्यांसाठी पहिल्या वर्षाचे ऍडव्हान्स
पूर्वीच्या मार्गदर्शक तत्वांप्रमाणे
अ ) पहिल्या वर्षाच्या ऍडव्हान्सची मुदत संपेपर्यंत निश्चित व्याजदर पूर्वीच्या मार्गदर्शक तत्वांप्रमाणे
ब ) पहिल्या वर्षाच्या ऍडव्हान्सची मुदत
संपल्यावर आधार दर - बेस रेट  +
1.25%(सध्याचा दर 9.50 %       )
क )  रु.2.00 लाखांवरील एकूण मर्यादा असलेल्या ऍडव्हान्सेस च्या बाबतीत पत श्रेणी - क्रेडिट रेटींग सध्याच्या मार्गदर्शक तत्वांप्रमाणे असणे आवश्यक असते.  त्यापुढे रु.25.00 लाखांपर्यंत एकूण मर्यादा असलेल्या अतिलघु-लघु उद्योगांच्या ऍडव्हान्सेससाठी व्याजदर क्रेडिट रेटींगला जोडला जाईल.  तरीसुध्दा रु.2.00 लाख ते रु.25.00 लाखांपर्यंत एकूण मर्यादा असलेल्या ऍडव्हान्सेसच्या बाबतीत धोक्याच्या दृष्टीकोनातून क्रेडिट रेटींग केले जाईल. 


II] रु.25.00 लाखांवरील (फंड + नॉन फंड ) एकूण मर्यादा असलेल्या अतिलघु, लघु आणि मध्यम उद्योगांना दिले जाणारे ऍडव्हान्सेस

रु.25.00 लाखांवरील एकूण मर्यादा असलेल्या सर्व अतिलघु, लघु आणि मध्यम उद्योगांना दिल्या जाणा-या ऍडव्हान्सेसच्या बाबतीत व्याज दर, क्रेडिट रिस्क रेटींगप्रमाणे ठरवण्यात येईल. पूर्वीच्या मार्गदर्शक तत्वांप्रमाणे असलेल्या पहिल्या वर्षातील निश्चित व्याजदर नंतर नव्या ऍडव्हान्सेसना लागू नसतील.

सध्याच्या ऍडव्हान्सेसच्या बाबतीत ऍडव्हान्सेसच्या पहिल्या वर्षासाठी असलेले व्याज दर पूर्वीच्या मार्गदर्शक तत्वांप्रमाणेच जारी राहतील. ऍडव्हान्सेसचे पहिले वर्ष पूर्ण झाल्यानंतर खालील कोष्टकातील त्यांच्या क्रेडिट रिस्क रेटींगप्रमाणे नवे दर लागू होतील.

पहिल्या वर्षाचा ऍडव्हान्स पूर्ण केलेल्या, एकूण मर्यादा रु.25.00 लाखांपुढे असलेल्या सर्व नव्या खात्यांसाठी आणि रु.25.00 लाखांवरील एकूण मर्यादा असलेल्या सध्याच्या खात्यांसाठी व्याजदरांची पुढील रचना सुरुवातीच्या स्तरापासून लागू होईल.

खेळते भांडवल सुविधा आणि/िंकवा मुदतीच्या कर्जांची सुविधा यांचा लाभ घेणा-या सर्व ऍडव्हान्सेसना तेच व्याज दर लागू होतील.

आधार दर - बेस रेट 8.25 %

क्रेडिट रिस्क
रेटींग
बेस रेटच्या आराखडय़ानुसार व्याज दर
रु.25 लाखांपासून रु.1 कोटींपर्यंत एकूण मर्यादेसाठी असलेला व्याजदर रु.1.00 कोटींपासून रु.5.00 कोटींपर्यंत
एकूण मर्यादेसाठी असलेला व्याजदर
रु.5.00 कोटींपासून रु.10.00 कोटींपर्यंत एकूण मर्यादेसाठी असलेला व्याजदर रु.10.00 कोटींवरील एकूण मर्यादेसाठी व्याज दर
अअअ बेस रेट +  2.50 %
(10.75 % )         
बेस रेट +  3.50 %
(11.75 % )       
बेस रेट +  3.75 %
(12.00 % )       
बेस रेट +  4.00 %
(12.25 % )       
अअ बेस रेट +  3.00 %
(11.25 %)
बेस रेट +  4.00 %
(12.25 %)
बेस रेट +  4.25 %
(12.50 %)
बेस रेट +  4.50 %
(12.75 %)
बेस रेट +  3.25 %
(11.50 %)
बेस रेट +  4.75 %
(13.00 %)
बेस रेट +  5.00 %
(13.25 %)
बेस रेट +  5.25 %
(13.50%)
इइइ बेस रेट +  4.00 %
(12.25 %)
बेस रेट +  5.50 %
(13.75 %)
बेस रेट +  5.75 %
(14.00 %)
बेस रेट +  6.00 %
(14.25 %)
इइ बेस रेट +  4.50 %
(12.75 %)
बेस रेट +  7.00 %
(15.25 %)
बेस रेट +  7.25 %
(15.50 %)
बेस रेट +  7.50 %
(15.75 %)
इ । उ बेस रेट +  5.00 %
(13.25 %)
बेस रेट +  7.50 %
(15.75 %)
बेस रेट +  7.75 %
(16.00 %)
बेस रेट +  8.00 %
(16.25%)

पहिल्या वर्षाच्या कामकाजासाठी असलेल्या अतिलघु-लघु-मध्यम उद्योगांसाठी असलेली पूर्वीची मार्गदर्शक तत्वे  :    (01.07.2010 पासून )

पत सुविधा (मुदत कर्जासह किंवा कर्जाशिवाय खेळत्या भांडवलाच्या सुविधा)           

सध्याचे दर

आधार दर व्यवस्थे अन्वये व्याजदर
(बेस रेट :  8.25% )

रु.25 लाखांपर्यंत

9.25%

बेस रेट + 1.00%(9.25%  )

रु.25 लाखांपासून रु.1 कोटीपर्यंत

10.25%

बेस रेट+ 2.00%(10.25%  )

रु.1 कोटींपासून 10 कोटींपर्यंत

11.25%

बेस रेट+ 3.00%(10.25%  )

 
अद्ययावतीकरणाची अंतिम तारीख : 25.09.2010
Presentation to Analysts Financial Results March 2012
 
अकौऊंट पोर्टेबिलिटी (खाते स्थलांतरण) बँकेच्या एका शाखेतून दुस-या शाखेत खात्याचे स्थलांतरण
 
व्हिसा डेबिट कार्ड वापराअन्वये ऑफर
 
Bank's Codes of Commitments to Customers
 
नव्या रिकरिंग ठेवी योजना महामिलियनोअर, महालखपती आणि महासंचय सिस्टीमॅटीक डिपॉझिट प्लॅन आरडी योजना
 
बचत खात्यातील ठेवींवरील व्याज रकमा देण्याच्या तारखेत बदल
 
सेवा शुल्क
 
23 मार्च, 2011 रोजी 'बँक ऑफ महाराष्ट्र'च्या समभागधारकांची विशेष सर्वसाधारण सभा.
 
०१.११.२०११ पासूनचे सुधारित आरटीजीएस आकार
 
एलेक्ट्रोनिक अंतर्गामी (इनवर्ड) व्यवहार 01.01.2011 पासून पैसे पाठवणा-याने दिलेल्या लाभार्थीच्या खाते क्रमांक माहितीच्या आधारेच केवळ आरटीजीएस, एनइएफटी, एनइसीएस, इसीएस व्दारे केले जातील.
 
महाबँक ज्युवेल कर्ज योजना - सोन्याच्या दागिन्यांच्या तारणावर कर्ज
 
विविध गरजांची पूर्तता करण्यासाठी गृह कर्जदारांसाठी `टॉप अप' कर्ज
 
`भारतीय विशेष व्यक्तित्वनिश्चिती मंडळा'बरोबर बँकेचा सहकार्य करार
 
देशांतर्गत मुदत ठेवींवरील व्याज