शैक्षणिक कर्ज योजना

शैक्षणिक कर्जासंबद्धी माहिती

हेतू भारतातील आणि परदेशातील शिक्षणासाठी
पात्रता भारतातील शिक्षण : पदवी अभ्यासक्रम/विद्यापीठ अनुदान आयोग - यूजीसी ची मान्यता असलेली विद्यापीठे. पदविकेपर्यंतचे अन्य अभ्यासक्रम/महाविद्यालयांतर्फे चालवण्यात येणारे पदवी अभ्यासक्रम/ विद्यापीठ अनुदान आयोग/शासन/एआयसीटीइ/एआयबीएमएस/आयसीएमआर इ.ची मान्यता असलेली विद्यापीठे/

परदेशातील शिक्षण : नोक-यांशी संबंधित व्यावसायिक/तांत्रिक/पदव्युत्तर अभ्यासक्रम पदव्युत्तर अभ्यासक्रम - एमसीए, एमबीए, एमएस इ.
वय विद्यार्थी भारतीय राष्ट्रीयत्व असलेले, प्रवेशपरिक्षा देऊन प्रवेश मिळवलेले/गुणवत्तेवर निवड झालेले
जास्तीत जास्त रक्कम भारतात : रु. 10.00 लाख
परदेशात : रु. 20.00 लाख
तारण/सुरक्षितता रु. 4.00 लाख पर्यंत - निर्वेध
हमीदार रु. 4.00 लाख ते रु.7.50 लाखांपर्यंत -
समाधानकारक त्रयस्थ पक्ष

रु. 7.50 लाखांवर
खालीलप्रमाणे योग्य ते मार्जिन - अंतर - दिल्यानंतर समान तारणाच्या मूल्याच्या प्रमाणाइतके वित्त अधिक 2 स्वीकारार्ह हमीदार

कर्जातून घेतलेले कॉम्प्युटर गहाण राहतील.
अंतर - मार्जिन रु. 4.00 लाखांपर्यंत - काहीही नाही

रु.4.00 लाखांपेक्षा जास्त -
5% भारतातील शिक्षणासाठी
15% परदेशातील शिक्षणासाठी
वजावट मर्यादा लागू नाही.
व्याज दर रु. 4.00 लाखांपर्यंत कर्जे (आधार दर + 2.00% )
रु. 4.00 लाखांवरील कर्जे (आधार दर + 2.75 % )
  • कर्जमुदतीच्या दरम्यान साधा व्याज दर, त्यानंतर दरमहा चक्रवाढ दराने
  • या योजनेअन्वये व्याज/परतफेडीसाठी खंडित कालावधी निर्धारित केल्यावर शिक्षणाच्या कालावधी दरम्यान लागू असेल तसे व्याज नियमितपणे जमा केले असेल तर कर्जदारांना 1% व्याज सवलत देण्यात येईल.
परतफेड समान मासिक हप्ते - 60 महिने (कर्ज + एकत्रित जमा झालेले व्याज )
कर्जमुदत - शिक्षण अभ्यासक्रम कालावधी + 1 वर्ष किंवा नोकरी मिळाल्यावर 6 महिने, जो कालावधी लवकरचा असेल तो
प्रकिऎया शुल्क काहीही नाही
विमा लागू नाही
इतर
  • विद्यार्थ्याना सहकर्जदार पालकांसह कर्ज मंजूर केले जाईल.
  • कर्ज टप्प्याटप्प्याने आवश्यकतेप्रमाणे शिक्षणसंस्था/महाविद्यालयांना थेट दिले जाईल.
इतर सुविधा विद्यार्थी आमच्या वेबसाईटव्दारे ऑनलाईन पध्दतीने शैक्षणिक कर्जासाठी अर्ज सादर करु शकतात. ही सुविधा सध्या निवडक 75 शाखांमध्ये उपलब्ध आहे (लवकरच ही संख्या लक्षणीयरित्या वाढेल. )
 

आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जावर व्याजात सवलत


आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक कर्जावर कर्जमुदतीच्या काळात व्याजात सवलत देण्याची प्रधान योजना

शैक्षणिक कर्ज योजनेअन्वये आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांनी घेतलेल्या कर्जाच्या मुदती दरम्यान पूर्ण व्याज सूट देण्याच्या योजनेला भारत सरकारने मान्यता दिली आहे. ही कर्जे भारतातील कुठल्याही मान्यताप्राप्त संस्थेतील तांत्रिक आणि व्यावसायिक स्वरुपाच्या प्रमाणित अभ्यासक्रमांपैकी कुठल्याही अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यासाठी ही योजना आहे.

या योजनेची मार्गदर्शक तत्वे आपल्या माहितीसाठी देत आहोत,ती खालीलप्रमाणे :

1. योजनेसाठी पात्रता

ही योजना भारतातील मान्यताप्राप्त तांत्रिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांपुरतीच मर्यादित आहे. व्याजातील सूट आमच्या बँकेच्या सध्याच्या आदर्श शैक्षणिक कर्ज योजनेशी संबंधित असेल. लोकसभेच्या कायद्यान्वये प्रस्थापित झालेल्या भारतातील शैक्षणिक संस्था, संबंधित कायदेशीर मंडळांनी मान्यता दिलेल्या अन्य संस्था, केंद्र/राज्य सरकारने स्थापन केलेल्या इंडियन इन्स्टीटय़ूटस ऑफ मॅनेजमेंट आणि अन्य संस्थांमधील तांत्रिक/व्यावसायिक अभ्यासक्रमात (बारावीनंतर ) प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांपुरतीच ही योजना मर्यादित आहे.

2. व्याजातील सूट मिळण्यासाठी पात्रता

या योजनेअन्वये पात्र विद्यार्थ्यांना एकदाच व्याजातील सूट मिळू शकेल. भारतातील पहिल्या पदवीपर्यंतचा अभ्यासक्रम किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रम/पदविका अशा अभ्यासक्रमांसाठी ही योजना आहे. तरीसुध्दा व्याज सवलत ही एकात्म अभ्यासक्रमांसाठीच असेल (पदवी + पदव्युत्तर )

या योजनेअन्वये मिळणारी व्याज सूट अभ्यासक्रम मध्येच सोडणा-यांना किंवा शिस्तीच्या अथवा शैक्षणिक कारणांवरुन संस्थामधून हकालपट्टी होणा-यांना मिळणार नाही. तरीसुध्दा अभ्यासक्रमातील खंड वैद्यकीय कारणांमुळे उदभवल्यास ही सूट मिळू शकेल, मात्र त्यासाठी त्या विशिष्ट शैक्षणिक संस्थेच्या प्रमुखांना समाधानकारक वाटतील अशी आवश्यक ती कागदपत्रे द्यावी लागतात.

3. सूट लागू होण्याचा काळ

या योजनेअन्वये कर्जमुदतीच्या काळासाठी म्हणजेच अभ्यासक्रमाच्या कालावधीसाठी + नोकरी मिळाल्यानंतर एक वर्ष किंवा सहा महिन्यांनंतर, जो कालावधी लौकरचा असेल त्या कालावधीसाठी, बँकेच्या आदर्श शैक्षणिक कर्ज योजनेअन्वये निर्धारित केल्याप्रमाणे तांत्रिक/व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक कर्ज घेण्याबद्दल आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना बँकेला द्यावे लागणारे व्याज भारत सरकारकडून बँकेकडे जमा केले जाईल.

4. लागू होण्याचा शैक्षणिक कालावधी

ही योजना 1 एप्रिल, 2009 पासून सुरु झालेल्या 2009-10 या शैक्षणिक वर्षापासून लागू झाली. 2009-10 (मंजुरीच्या तारखेशी काही संबंध नाही ) या शैक्षणिक वर्षापासून सुरु होणारी कर्जाची रक्कमच केवळ व्याजातील सूट देण्याच्या या योजनेखाली येते.

टीप : 2009-10 या शैक्षणिक वर्षाआधी सुरु झालेल्या अभ्यासक्रमांसाठी देण्यात आलेल्या कर्जाऊ रकमांबाबत व्याजातील सवलतीच्या योजनेचा विचार केला जाणार नाही.

5. उत्पन्न मर्यादा

पालकांचे/कुटुंबाचे एकूण कमाल वार्षिक उत्पन्न रु.4.5 लाख प्रति वर्ष (सर्व स्त्रोतांमधून ) असलेल्या आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना या योजनेचे लाभ मिळू शकतील. सर्व स्त्रोतांमधून कुटुंबाची/पालकांची एकूण कमाल उत्पन्न मर्यादा वर निर्देश केल्याप्रमाणे असलेल्या आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी असलेली ही योजना सामाजिक पार्श्वभूमीपेक्षा आर्थिक निर्देशांकावर आधारित आहे.

6. आयकर प्रमाणपत्रासाठी असलेले सक्षम अधिकारी

केंद्र किंवा राज्य सरकारच्या योजनांप्रमाणेच या योजनेअन्वये आर्थिक परिस्थितीच्या प्रमाणपत्रासाठी राज्य शासनाने अधिकार दिलेल्या सरकारी अधिका-यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला विद्यार्थ्यांना सादर करावा लागतो.

महाराष्ट्रात आयकर प्रमाणपत्र देण्यासाठी तहसीलदारांना सक्षम अधिकारी म्हणून मान्यता आहे.

इतर राज्यांसाठी विद्यार्थी कर्जदारांनी अशा प्रकारची उत्पन्न प्रमाणपत्रे देण्याचा अधिकार मिळालेल्या सक्षम अधिका-यांच्या तपशिलांसंबंधी माहिती मिळवण्यासाठी आमच्या शाखा अधिका-यांशी संपर्क साधावा.

7. इतर

राज्य सरकारच्या अन्य योजनेअन्वये अशी सवलत घेतली जात नसल्यास या योजनेअन्वये व्याज सवलतीचा लाभ घ्यावा.

या योजनेअन्वये कर्जमुदती दरम्यान व्याज सवलतीचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करण्याकरिता (शैक्षणिक कर्जे जेथून घेतली असतील तेथे ) संबंधित शाखांमध्ये सर्व पात्र विद्यार्थी कर्जदारांनी भेटावे अशी विनंती आहे. व्याज सवलतीकरिता अर्ज सादर करण्यासाठी शाखा अधिका-यांना भेटण्याआधी वरील सर्व माहिती काळजीपूर्वक अभ्यासावी.

या योजनेअन्वये व्याज सवलतीचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी कर्जदारांनी पुढील कार्यपध्दतीचा अवलंब करावा :

  1. मुद्दा क्र. 5 मध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे आयकर प्रमाणपत्र मिळवावे.
  2. सर्व योग्य ती प्रमाणपत्रे घेतली असल्याची खात्री करुन घ्यावी आणि संबंधित शाखांमधील अधिका-यांना भेटावे.
  3. सवलतीसाठी असलेला अर्ज सादर करावा. (शाखा अधिंकारी अर्ज/करारनामा देतील.)
अंतिम अद्ययावतीकरण तारीख - - 27.08.10
Presentation to Analysts Financial Results March 2012
 
अकौऊंट पोर्टेबिलिटी (खाते स्थलांतरण) बँकेच्या एका शाखेतून दुस-या शाखेत खात्याचे स्थलांतरण
 
व्हिसा डेबिट कार्ड वापराअन्वये ऑफर
 
Bank's Codes of Commitments to Customers
 
नव्या रिकरिंग ठेवी योजना महामिलियनोअर, महालखपती आणि महासंचय सिस्टीमॅटीक डिपॉझिट प्लॅन आरडी योजना
 
बचत खात्यातील ठेवींवरील व्याज रकमा देण्याच्या तारखेत बदल
 
सेवा शुल्क
 
23 मार्च, 2011 रोजी 'बँक ऑफ महाराष्ट्र'च्या समभागधारकांची विशेष सर्वसाधारण सभा.
 
०१.११.२०११ पासूनचे सुधारित आरटीजीएस आकार
 
एलेक्ट्रोनिक अंतर्गामी (इनवर्ड) व्यवहार 01.01.2011 पासून पैसे पाठवणा-याने दिलेल्या लाभार्थीच्या खाते क्रमांक माहितीच्या आधारेच केवळ आरटीजीएस, एनइएफटी, एनइसीएस, इसीएस व्दारे केले जातील.
 
महाबँक ज्युवेल कर्ज योजना - सोन्याच्या दागिन्यांच्या तारणावर कर्ज
 
विविध गरजांची पूर्तता करण्यासाठी गृह कर्जदारांसाठी `टॉप अप' कर्ज
 
`भारतीय विशेष व्यक्तित्वनिश्चिती मंडळा'बरोबर बँकेचा सहकार्य करार
 
देशांतर्गत मुदत ठेवींवरील व्याज