अध्यक्षांचा संदेश

Narendra Singh (Chairman & Managing Director)

प्रिय अतिथी,

आमच्या बँकेच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी आपण वेळ काढल्याबद्दल मी आपले आभार मानतो.

व्यापार आणि उद्योगक्षेत्रातील लघु स्तरावरील मंडळी आणि बँकींग सुविधा उपलब्ध नसलेल्या त्या काळातील सामान्य माणसांना बँकींग सेवा देण्यासाठी मोठया दूरदर्शी मंडळींनी ७७ वर्षांपूर्वी स्थापन केलेली महाबँक सुरुवातीपासूनच आपली धोरणे , कार्यपध्दती आणि एकूण व्यवसायाच्या आखणीत सामान्य माणसालाच केंद्रस्थानी ठेवत आपली वाटचाल करत आलेली आहे.

१९३६ साली शुभारंभ झालेल्या बँकेने देशसेवेच्या आपल्या प्रवासात अनेक मैलांचे दगड मागे टाकले आहेत.

ग्राहकांना माहिती तंत्रज्ञानाचा लाभ मिळावा या हेतूने दोन दशकांच्याही आधीच्या काळात अत्याधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करणा-या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये आमची बँक समाविष्ट होते.

देशभरातील २६ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांमध्ये बँकेचे अस्तित्व आहे.

सर्व १५७७ शाखा सीबीएस अन्वये कार्यान्वित असून ' कुठेही , कोणत्याही वेळी बँकींग ' तत्वावर सेवा उपलब्ध आहेत.

बँकेच्या ५०१ एटीएम केंद्रांच्या विस्ताराचा लाभ घेणा-यांचे सरासरी दैनिक प्रमाण सर्वात जास्त असल्याने ही केंद्रे ग्राहकांच्या दृष्टीने सगळ्यात सोयीस्कर अशा ठिकाणीच स्थापन झाली असल्याचे सिध्द होते.

बँकेने माहिती तंत्रज्ञान विभागाच्या कामगिरीबद्दल डीएनव्ही या आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र संस्थेचे आयएसओ २७००१ - २००५ प्रमाणपत्र मिळवले आहे. कार्यपध्दती , धोरणे , प्रत्यक्ष कामकाज आणि पायाभूत सुविधांसंबंधी सुरक्षा क्षमतांच्या आंतरराष्ट्रीय प्रमाणांची पूर्तता बँकेने केल्याचेच त्यामुळे सिध्द झाले आहे.

ग्राहकांना बँकींगच्या सुखसोयी देण्यासाठी ' महाकनेक्ट ' ( इंटरनेट बँकींग सेवा ) , मोबाईल बँकींग , फोन बँकींग आणि एसएमएस बँकींग सुविधा तसेच रकमा पाठवण्यासाठी ऑनलाईन सुविधा अशा माहिती तंत्रज्ञानावर आधारित सेवांचे विविध प्रकार बँकेने उपलब्ध करुन दिले आहेत.

१९६९ मध्येच राष्ट्रीकृत झालेल्या महाबँकेने ग्रामीण आणि निमशहरी भागात आपला विस्तार आणि सेवा यात वाढ करत ठेवली आहे. परिणामतः अगदी आजही ग्रामीण आणि निमशहरी भागांमध्ये बँकेच्या ५४ % शाखा आहेत.

ग्रामीण विकासाच्या दृष्टीने नवे उपक्रम ' बँक ऑफ महाराष्ट्र ' सतत हाती घेत असते.

' बँक ऑफ महाराष्ट्र ' ने आर्थिक समावेशाच्या संकल्पनेचा १९८९ मध्येच अंगीकार केला , या वर्षी मुख्यतः आर्थिकदृष्ट्या दुर्बळ आणि स्त्रियांच्या सबलीकरणाला उत्तेजन देण्यासाठी ग्रामीण महिला व बालक विकास मंडळ ही स्वयंसेवी संस्था स्थापन झाली.

महाराष्ट्र राज्यामध्ये २०१०-११ दरम्यान ' बचत गट बँक दुवा ' कार्यक्रमाअन्वये व्यावसायिक बँकांच्या श्रेणीत सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल ' बँक ऑफ महाराष्ट्र ' ला प्रथम पुरस्कार देऊन ' नॅशनल बँक फॉर ऍग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट ' ने (नाबार्ड) सन्मानित केले. सध्या बँकेने सुरु करण्यास हातभार लावलेले असे ८५ , ००० बचत गट अस्तित्वात आहेत. ग्रामीण विकासाची कामे हाती घेण्यासाठी बँकेने स्थापन केलेल्या ' महाबँक कृषि संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठान ' ( महाबँक ऍग्रीकल्चरल रिसर्च अँड रुरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन ) या विश्‍वस्त संस्थेसाठी ' ग्रामीण विकास केंद्र ' आणि ७ ' महाबँक सेल्फ एम्प्लॉयमेंट ट्रेनिंग इन्स्टिटयूट ' कार्यरत आहेत.

खूप अंतर्गत भागात स्थापन केलेली १०० महाबँक ग्राम सेवा केंद्रे हा आर्थिक समावेश योजनेअन्वये हाती घेतलेला एक नवीन , वैशिष्ट्यपूर्ण असा उपक्रम आहे. त्या त्या गावाजवळील बँकेच्या पालक शाखेचे कायमस्वरुपी कर्मचारी लॅपटॉप-सज्ज होऊन या गावांमध्ये दर महिन्याला विशिष्ट दिवशी सर्व प्रकारच्या बँकींग सेवा देण्यासाठी उपलब्ध असतील , त्यामुळे गावक-यांना या सेवांचा लाभ त्यांच्या दाराशीच घेता येईल.

बँकेकडे सोपवण्यात आलेली १२१५ गावे पूर्णपणे बँकेने आर्थिक समावेश योजनेअन्वये समाविष्ट केली आहेत.

आपली निष्ठा आणि ग्राहकाधार आम्हाला देणारे आमचे १.३० कोटी ग्राहक हीच आमची मूलभूत शक्ती असल्याचीही भावना येथे मी व्यक्त करतो.

१४००० समर्पित कर्मचारी , अत्याधुनिक तंत्रज्ञान तसेच समाजातील सर्व घटकांच्या बँकींगच्या गरजांची पूर्तता करणा-या विविध योजना आणि सेवांनिशी महाबँक सातत्याने आपले बँकींग आनंदमय करत राहील.

आमच्याबरोबर बँकींग करण्याचा आनंद घेण्यासाठी आपले स्वागत आहे.

आपणा सर्वांना शुभेच्छा. ,

आपला,

नरेंद्र सिंह,
अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

01-02-2012

Last upadate date - 4-02-2012

Presentation to Analysts Financial Results March 2012
 
अकौऊंट पोर्टेबिलिटी (खाते स्थलांतरण) बँकेच्या एका शाखेतून दुस-या शाखेत खात्याचे स्थलांतरण
 
व्हिसा डेबिट कार्ड वापराअन्वये ऑफर
 
Bank's Codes of Commitments to Customers
 
नव्या रिकरिंग ठेवी योजना महामिलियनोअर, महालखपती आणि महासंचय सिस्टीमॅटीक डिपॉझिट प्लॅन आरडी योजना
 
बचत खात्यातील ठेवींवरील व्याज रकमा देण्याच्या तारखेत बदल
 
सेवा शुल्क
 
23 मार्च, 2011 रोजी 'बँक ऑफ महाराष्ट्र'च्या समभागधारकांची विशेष सर्वसाधारण सभा.
 
०१.११.२०११ पासूनचे सुधारित आरटीजीएस आकार
 
एलेक्ट्रोनिक अंतर्गामी (इनवर्ड) व्यवहार 01.01.2011 पासून पैसे पाठवणा-याने दिलेल्या लाभार्थीच्या खाते क्रमांक माहितीच्या आधारेच केवळ आरटीजीएस, एनइएफटी, एनइसीएस, इसीएस व्दारे केले जातील.
 
महाबँक ज्युवेल कर्ज योजना - सोन्याच्या दागिन्यांच्या तारणावर कर्ज
 
विविध गरजांची पूर्तता करण्यासाठी गृह कर्जदारांसाठी `टॉप अप' कर्ज
 
`भारतीय विशेष व्यक्तित्वनिश्चिती मंडळा'बरोबर बँकेचा सहकार्य करार
 
देशांतर्गत मुदत ठेवींवरील व्याज