एक्झिक्यूटर, ट्रस्टी आणि ऍटर्नी
 
कोणताही यशस्वी बँकर केवळ ठेवी आणि ऍडव्हान्सेस पुरताच व्यवहार करत नाही.  असा बँकर मुख्यत: व्यक्तीशी व्यवहार करत असतो आणि त्याने  एक मित्र-मार्गदर्शक म्हणून ग्राहकांच्या बाबींशी संबंधित राहणे आवश्यक असते.  त्याने समाजकल्याणात सक्रीय सहभागी होणे आणि ज्या समाजाला सेवा दिल्या जातात, त्या समाजाचा एक भाग होऊन राहणे आवश्यक असते. 

काही प्रमाणात 1946 साली पूर्ण मालकी असलेल्या `द महाराष्ट्र एक्झिक्यूटर अँड टखस्टी कं. लि. या संलठ कंपनीतर्फे `बँक ऑफ महाराष्ट्र` या उद्दीष्टांची पूर्तता करत आहे.

तुमच्या मालमत्तेचे ऍटर्नी, सार्वजनिक टखस्ट  किंवा खाजगी टखस्ट किंवा मृत्युपत्राची व्यवस्था बघण्याचे काम तुम्ही एक्झिक्यूटर आणि किंवा टखस्टी म्हणून सोपवू शकता.


आमच्या ट्रस्टी कंपनीतर्फे पुढील विश्वासू सेवा उपलब्ध असतात :


  1. मृत्युपत्राचे व्यवस्थापक -
    • आपले मृत्युपत्र तयार करण्यासाठी आपण आमचा सल्ला घेऊ शकता. आपल्या इच्छेनुसार आम्ही आपल्यासाठी मृत्युपत्राचा मसुदा तयार करु आणि तो सुरक्षित ठेवू.
    • आपल्या मृत्युपत्राची अंमलबजावणी करण्याचे गुंतागुंतीचे काम आम्ही करतो.
    • विविध सोपस्कार आणि कार्यपध्दतींची पूर्तता करुन बँका, कंपन्या, म्युच्युअल फंड, युनिट टखस्ट इत्यादींकडून आम्ही आपल्या मालमत्तेचे संपादन करुन तिची योग्य ती तजवीज करु.
    • पूर्ण काळजी आणि दूरदृष्टी ठेवून योग्य तो विनिमय आणि दीर्घ प्रयत्न यांची खात्री बाळगत आपल्या इच्छेप्रमाणे आपल्या कुटुंबियांच्या आणि निकटवर्तीयांच्या हितासाठी आम्ही हे मृत्युपत्र सांभाळू.
    • ख-या अर्थाने आपल्या इच्छांची पूर्तता करुन शेवटी आपल्या इच्छेप्रमाणे नमूद केलेल्या व्यक्तींकडे हे मृत्युपत्र सोपवू.
    • हे मृत्युपत्र आपल्या नात्यातील व्यक्ती किंवा जवळचा मित्र असलेल्या कोणाकडे सोपवल्यास जे तणाव आणि समस्या निर्माण होऊ शकतात, ते तणाव आणि समस्या टळतात.
    • आम्ही संस्थात्मक पातळीवरुन काम करत असल्याने, हे काम कौशल्याने आणि आमच्या अनुभवाचा-ज्ञानाचा उपयोग करुन करु :
      • पध्दतशीर अंमलबजावणी
      • सातत्य
      • पूर्वगऎहविरहित दृष्टीकोन
      • बाह्य प्रभावांपासून मुक्त
      • संपूर्ण संस्थात्मक पाठबळ

  2. खाजगी ट्रस्टचे व्यवस्थापन :

    आपल्या हयातीत आणि नंतरही आपल्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींच्या हितासाठी आपली काही मालमत्ता बाजूला काढून ठेवण्याचा विचार आपण करत असाल.

    मात्र मानसिक अक्षमता, शारिरिक व्यंग, लहान वय इ. बाबींमुळे आपल्या मालमत्तेची योग्य ती काळजी आपल्यावर अवलंबून असलेल्या व्यक्ती घेऊ शकणार नाहीत असेही आपल्याला वाटते.

    त्यासाठी आपल्याला खाजगी ट्रस्ट स्थापन करुन मालमत्तेची योग्य ती काळजी घेतली जाईल अशी व्यवस्था करता येईल. या टखस्टवर आपल्या हयातीत आणि नंतरही आपल्या सूचनांनुसार आपण परिणामकारक नियंत्रणही ठेवू शकता.

    • असा खाजगी ट्रस्ट स्थापन करण्यासाठी आम्ही आपल्याला मार्गदर्शन करतो.
    • अशा ट्रस्टचे एकमेव व्यवस्थापक ट्रस्टी किंवा इतर सल्लागार ट्रस्टीबरोबर आम्ही व्यवस्थापक ट्रस्टी म्हणून काम करतो.

    ट्रस्टी म्हणून
    • आम्ही आपल्या मालमत्तेचे संरक्षण करतो.
    • आम्ही गुंतवणूक, पुनर्गुंतवणूक, व्याज/लाभांशाचे संकलन करतो.
    • आम्ही नियमित कालावधीने रकमा देतो.
    • विशेष गरजांसाठी आम्ही रकमा देतो आणि
    • आम्ही शेवटी टखस्ट डीडप्रमाणे मालमत्तेची वाटणी करतो.

  3. सार्वजनिक कल्याणकारी ट्रस्ट

    काही वेळा कृतज्ञतेच्या गाढ भावनेतून आणि सामाजिक बांधिलकीच्या विचाराने सामाजिक कार्यासाठी परोपकारी वृत्तीने आपल्या संपत्तीचा काही भाग देणगीरुपाने द्यावा अशी आपली इच्छा असते.

    त्यासाठी कायमस्वरुपी व्यवस्था केली पाहिजे अशी आपली इच्छा असते.

    • सार्वजनिक धर्मादाय टखस्टच्या स्थापनेसाठी आम्ही मार्गदर्शन करतो.
    • आम्ही आपल्यासाठी टखस्ट डीडचा मसुदा करुन देतो.
    • हा दस्तऐवज धर्मादाय आयुक्तांकडे नोंदवण्याची व्यवस्था करतो.
    • आयकर कायद्यान्वये आवश्यकता असलेली मान्यता आम्ही टखस्टला मिळवून देतो.
    • आम्ही हिशेब ठेवतो आणि दरवर्षी हिशेबांचे लेखा परिक्षण करुन घेतो.
    • आम्ही नियमित कालावधीने रिटर्नस आणि स्टेटमेंट संबंधित अधिका-यांकडे सादर करतो.
    • सल्लागार टखस्टींच्या आम्ही सभा घेतो आणि या सभांचे वृत्तांतही ठेवतो.

    अशा प्रकारे सामाजिक कार्य मोकळेपणाने करण्यासाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक आणि आर्थिक सोपस्कारांच्या ओझ्यातून आम्ही आपल्याला मोकळे करतो.

    आम्ही संस्थेच्या रुपाने कार्य करत असल्याने आमच्याकडे निरंतर परंपरा आहे आणि त्यामुळेच निरंतर स्वरुपाच्या टखस्टची उद्दीष्टेही अंमलात आणण्याच्या दृष्टीने आणि व्यवस्था पाहण्याच्या दृष्टीने आमचे सहाय्य योग्य ठरते.

  4. ऍटर्नी (मुखत्यार) अम्हणून गुंतवणुकी आणि घराच्या स्वरुपातील मालमत्तेचे व्यवस्थापन

    आपण आपल्या आईपासून आणि मातृभूमीपासून हजारो योजने दूर असलात की आपल्या स्थावर-जंगम मालमत्तेची काळजी घेणा-या एखाद्या व्यक्तीची आपल्याला गरज भासते.

    त्यामुळेच आपल्या मालमत्तेची व्यवस्था पाहण्यासाठी आपण आम्हाला कुलमुखत्यारपत्र देऊ शकतो.

    आपले ऍटर्नी म्हणून आम्ही खालील जबाबदा-या स्वीकारतो :

    • आपल्या सिक्युरिटीज सुरक्षितपणे आम्ही आमच्या ताब्यात ठेवतो.
    • भाडे आणि व्याज गोळा करतो.
    • आपल्या सूचनांनुसार अतिरिक्त निधीची गुंतवणूक आणि पुनर्गुंतवणूक करणे.
    • कर भरणे
    • टेलिफोन बिल, एलेक्ट्रिसिटी बिल, सोसायटी शुल्क इत्यादी देणी भरण्याची व्यवस्था करणे
    • घराच्या मालमत्तेची काही डागडुजी, दुरुस्ती करायची झाल्यास अशा मालमत्तेची देखभाल करणे

    आम्ही या सेवा विशेषत: सर्व ज्येष्ठ नागरिकांना प्रत्यक्ष त्यांच्याशी संपर्क साधून काळजी घेत प्रेमाने देतो.


  5. अज्ञान मुलांच्या मालमत्तेचे पालकत्व :

    दुर्देवाने अज्ञान मुलांचे पालक कालवश झाले तर अशा अज्ञान मुलांच्या मालमत्तेची काळजी आम्ही घेतो.

    या सर्व सेवा खूप रास्त दरात आणि त्याही आपल्याला समाधान देतील अशा परिणामकारकतेच्या खात्रीसह उपलब्ध आहेत.

दर पत्रक
खाजगी/सार्वजनिक ट्रस्ट
नव्या ट्रस्ट डीडचा मसुदा तयार करणे आणि त्यासंबंधी सल्ला देणे या कामांचे सुरुवातीचे शुल्क रु. 2,500/-
प्रत्येक पूरक दस्तऐवज रु.750/-  (खाजगी ट्रस्टसाठी )
रु.3,000/- (सार्वजनिक ट्रस्टसाठी)
टखस्ट फंडच्या वृध्दीच्या स्वीकृतीचे शुल्क (एका वेळचे )
रु.5 लाखांपर्यंत
रु.5 लाखांवर
रकमेच्या 2 %
रकमेच्या 1 %
धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी रु.2,500/- मुंबईत
आयकर खात्याकडे नोदंणी रु.2,000/- अन्य ठिकाणी
आयकरा अन्वये 80 जी नूतनीकरण
रु.750/-
वार्षिक व्यवस्थापन शुल्क  
सार्वजनिक टखस्टसाठी टखस्ट फंडच्या 1 % (कमीत कमी रु.500/-)
खाजगी टखस्टसाठी टखस्ट फंडच्या 0.75% (कमीत कमी रु.500/-)
रद्द करण्याचे शुल्क रु.1,000/-
   
मृत्युपत्र
सल्ला सेवा आणि मसुदा तयार करण्याचे शुल्क
रु.2,000/-
पूरक दस्तऐवज (कोडीसिल ) रु.750/-
सुरक्षितरित्या ताब्यात ठेवण्याचे शुल्क
सध्याच्याखात्यांसाठी(31.03.2000पर्यंतची )
रु.50/-
नव्या खात्यांसाठी रु.150/-
कार्यवाहीच्या वेळी आकारले जाणारे कार्यवाही शुल्क
a) जंगम मालमत्तेच्या किंमतीच्या 3%
  शेअर्स/डिबेंचर्स शिवाय मालमत्तेच्या किंमतीच्या 5%
b) जंगम मालमत्ता (बाजारपेठेतील मूल्यानुसार) वारसदारांच्या ताब्यात असताना
  रु.10 लाखांपर्यंत किंमतीच्या 2%
  रु.10 लाखांवरील 1% (कमीत कमी 3,000/- )
मालमत्तेची विक्री
(वारसदारांच्या किंवा अन्य कोणाच्या ताब्यात असल्यास )
रु.10 लाखांपर्यंत मालमत्तेच्या किंमतीच्या 3%
रु.10 लाखांवरील मालमत्तेच्या किंमतीच्या 2%
रद्द करण्याचे शुल्क रु. 500/-
कंपनीची एक्झिक्यूटर/टखस्टी म्हणून नेमणूक न झाल्यास सल्ला आणि मसुदा तयार करण्याचे शुल्क दुप्पट असेल.
 
कुलमुखत्यारपत्रान्वये मालमत्तेचे व्यवस्थापन
सल्ला सेवा आणि मसुदा तयार करण्याचे शुल्क रु. 2,000/-
सुरक्षितरित्या ताब्यात ठेवण्याचे शुल्क रु.10/- प्रति वर्ष प्रति स्कऎाsप (आमच्या प्रत्यक्ष ताब्यात असताना)
वार्षिक व्यवस्थापन शुल्क
जंगम एकूण गुंतवणुकीच्या 0.75 %
स्थावर  
भाडय़ाने 10% - भाडय़ाच्या उत्पन्नाच्या
  स्वत:च्या ताब्यातील/िरकामे संबंधित कामाच्या स्वरुपाचा विचार करुन उभयपक्षांनी निर्णय घेणे.
 
 
मिटींग शुल्क  
ऑफिसमध्ये रु.100/-
  ऑफिसबाहेरील रु.200/-
  ऑफिसच्या कामाच्या वेळेनंतर रु.500/-
कोर्टात उपस्थिती (प्रत्येक) रु.100/- + प्रवास
अधिका-याची वैयक्तिक भेट रु.200/- + प्रवास
विशेष संदेश कर्मचारी Rs.25/- + प्रवास
विकऎाs/शेअर्सची खरेदी/सरकारी सिक्युरिटीज किंमतीच्या 0.50 %
शेअर्सचे डिमॅट (एक वेळ) डिमॅट खाते उघडलेल्या बँकेच्या आकाराइतकेच सेवा शुल्क
टपाल, फोटो कॉपी, नोटरी, व्हॅल्यूएशन, मुद्रांक शुल्क, ऑडिट फी इत्यादी स्वरुपाचे खर्च
प्रत्यक्ष तत्वावर